HomeUncategorizedनगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण दोन माजी संचालक पोलिसांच्या ताब्यात

नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण दोन माजी संचालक पोलिसांच्या ताब्यात

advertisement

अहमदनगर दिनांक 25 जानेवारी
अहमदनगर मधील ११९ वर्ष जुन्या असलेल्या नगर अर्बन बँकेत कर्ज घोटाळा प्रकरणी आता पोलिसांनी आपली कारवाई तीव्र केली असून या घोटाळा प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक साठे आणि कोठारी नामक अशा दोन माजी संचालकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.


मागील आठवड्यात न्यायालयाने पोलिसांच्या कामकाजावर ताशेरे ओढल्यानंतर पोलिस आता ॲक्शन मोडवर आली आहे या प्रकरणात अनेक दिग्गज व्हाईट कलर आरोपी असल्याने पोलिसांच्या कामावर परिणाम होताना दिसत होता मात्र ही गोष्ट बँक बचाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी आणि ठेवीदारांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर लगेच आता पोलिसांनी दोन माजी संचालकांना ताब्यात घेतल्यामुळे पोलीस ॲक्शन मोडवर आले असल्याचे दिसून येतेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular