Home शहर मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी मन्सूर शेख,उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदी...

मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी मन्सूर शेख,उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदी प्रा.अमोल वैद्य तर महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी न्युज टुडे 24चे संपादक आफताब शेख यांची नियुक्ती

अहमदनगर : दि.7 डिसेंबर

मराठी पत्रकार परिषदेच्या
सरचिटणीसपदी पत्रकार मन्सूरभाई शेख तर कार्याध्यक्षपदी रायगडचे पत्रकार मिलिंद
अष्टीवकर यांची निवड करण्यात आली.
पुढील दोन वर्षांसाठी ही निवड आहे. परिषदेचे
मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि
अध्यक्ष शरद पाबळे यांनी मुंबईत ही घोषणा
केली. मान्सूर शेख गेली पंचवीस वर्षे पत्रकारितेत आहेत. सुमारे पंधरा वर्षांपासून ते मराठी पत्रकार परिषद, मुंबई या संघटनेशी जोडलेले आहेत. परिषदेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असतो. अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.तर महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी न्युज टुडे 24चे संपादक आफताब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच नगर जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन संघटनेच्या सोयीसाठी मराठी पत्रकार परिषदेने उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा असे दोन भाग केले असून दोन्हीकडे परिषदेच्या स्वतंत्र शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून अकोले येथील सार्वमत दैनिकाचे पत्रकार प्रा.अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली आहे.उत्तर नगरमधील अकोले, संगमनेर,श्रीरामपूर, कोपरगाव, राहूरी, राहता आदि तालुक्यातील परिषदेचं संघटन मजबूत करण्याची जबाबदारी प्रा.अमोल वैद्य यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख आदी सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रा.अमोल वैद्य यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version