अहमदनगर दि.७ जुलै
अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मार्केट यार्ड येथील दोनशे गाळे पाडून दोन हजार पेक्षा जास्त लोकांना रस्त्यावर आणल्याचा आरोप करत दिलीप सातपुते, शशिकांत गाडे,युवराज गाडे,संदेश कार्ले आणि बाळासाहेब हराळ यांचा निषेध आज मार्केट यार्ड येथे व्यापाऱ्यांनी केला आहे तशा आशयाचे फलक यावेळी झळकवण्यात आले होते.
मार्केट यार्ड मधील दोनशे व्यापारी गळ्या बाबत नुकताच कोर्टाने निर्णय दिला आहे. हे गाळे पाडण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर आता या प्रकरणात राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणाचा पाठपुरा करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा व्यापाऱ्यांनी निषेध करत व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणू नये जे राजकारण करायचे आहे तुम्ही ते राजकीय पातळीवर करावे मात्र व्यापारांच्या पोटावर पाय देऊ नये अशी भावना यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
मार्केट यार्ड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व्यापाऱ्यांनी या ठिकाणी घोषणा देत आंदोलन केले अनेक वर्षांपासून व्यवसाय करत असताना राजकारणाच्या माध्यमातून अशा प्रकारे व्यापार उध्वस्त करणे हे कोणत्या राजकीय पक्षाचा अजेंडा आहे असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय.
व्यापाऱ्यांना आता सरकार दरबारी न्याय मागवा लागेल व्यापारी पोट भरण्यासाठी जागा घेतो मात्र त्याच्यावर अन्याय होतेय असे या घटने मधून समोर येतोय अशा भावना ही व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या
या वेळी विशाल पवार,राजेंद्र बोथरा बबलू नवलानी गणेश कोठारी, प्रसाद बोरा, नितीन शिंगवी निनाद औटी, प्रीतम नवलानी,राहुल सोनीमंडलेचा , बळा साहेब दरेकर,सुरेश कर्पे,अभय लूनिया,महविर छाजेड,मनीषा दर्डे,विशाल दाभाडे,दिनेश सोनी मंडलेचा, बाळासाहेब पवार,आदींसह व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वेळ पडल्यास सर्व व्यापारी सामुहीक आत्मदहन करतील असा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय.