अहमदनगर दि. २९ ऑक्टोबर
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसले आहेत त्यांचे प्रकृती आता हळूहळू खालवत चालली असून त्यांनी पाणीही सोडले असल्यामुळे आता त्यांचे प्रकृती गंभीर होत चालली आहे त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिल्याने सरकार आता चांगलेच कात्रीत सापडले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी उपोषण आणि आंदोलने सुरू आहेत अहमदनगर शहरातील तहसील कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून या उपोषण स्थळी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी दिवसभर साखळी उपोषण करत आहेत मात्र ज्या उपोषणाला दोन दिवसापूर्वी शहरातील आमदार, नगरसेवक राजकीय पुढाऱ्यांनी पाठिंबा दिला मात्र अहमदनगर शहरात बहुसंख्येने मराठा समाज असतानाही मग या साखळी उपोषणाला रोज तेच तेच चेहरे का दिसतात फक्त उपोषण करत असलेल्या ठराविक लोकांनाच आरक्षण मिळणार आहे का ? असाही प्रश्न आता उपस्थित राहतोय जे रोज उपोषण स्थळी रोज हजेरी लावतात ते सर्व कामकाज करणारे आहेत मात्र समाजासाठी त्यांनी सर्व बाजूला ठेवून उपोषण सुरू ठेवले आहे.नगर शहरात मराठा समाजा मोठ्या संख्येने विखुरलेला आहे मात्र हा विखुरलेला समाज ठराविक नेत्यांच्या मागे उभा राहिला असल्यामुळे नेत्यांनी इशारा दिलातरच पुढील भूमिका घेत असल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळतं लाखोंच्या संख्येने मराठा समाज असतानाही शेकडो लोक सुद्धा या उपोषण स्थळी येत नसल्याने एक खेदाची बाब आहे. मराठा आरक्षण हे ठराविक लोकांना नाहीतर मराठा समाजातील सर्वच घटकांना मिळणार आहे त्यामुळे एक दिवस तरी आपल्या जातीसाठी या ठिकाणी येऊन आपली ताकद दाखवण्याची गरज असताना हा मराठा समाज नेत्यांच्या मागे उभा राहून त्यांनी दिलेल्या इशारावर कधीपर्यंत नाचणारा हे नेते कधीच कोणाचे होत नाहीत त्यामुळे समाजासाठी एक दिवस तरी मराठा समाजाने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.
जे कार्यकर्ते रोज दिवसभर या ठिकाणी उपोषण करत आहे त्यांना साथ देण्याचा काम समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करण्याची गरज असताना फक्त फोटो पुरते आणि दिखव्या पुरते येणारे नेते खूप आहेत मात्र मनापासून संपूर्ण मराठा समाज जर रस्त्यावर उतरला तर मुंगी जायला सुद्धा जागा राहणार नाही एवढा समाज नगर शहरामध्ये असताना शंभर लोक उपोषणासाठी येत नाही ही एक मोठी खेदजनक बाब आहे. त्यासाठी आता मराठा समाजाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे आपल्यासाठी नाही तर मग दुसऱ्यांसाठी का त्यामुळे आता एक दिवस जातीसाठी प्रत्येक मराठ्याने या उपोषण स्थळी येणे गरजेचे आहे आणि उपोषणाला बसलेल्या सर्वांचाच उत्साह वाढवण्याची गरज आहे. पक्षभेद विसरून आणि राजकारण चुलीत घालून प्रत्येकाने समाजासाठी आणि उपोषणाला बसलेल्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एकदा तरी अवश्य भेट द्या..