अहमदनगर दि.२५ ऑक्टोबर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता जामखेड तालुक्यातील खर्डा येथील संतोष साबळे या तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका संतोष साबळे या तरुणाने घेतली आहे. त्यामुळे सर्व प्रशासन आता चांगलेच कामाला लागले आहे ही घटना कळताच खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ या टॉवर शेजारी धाव घेतली असून या तरुणाला खाली उतरण्याचे प्रयत्न सध्या प्रशासनाच्या वतीने सुरू आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले होते मात्र सरकारला मार्ग काढण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ मनोज तरंगे पाटील यांनी दिला होता मात्र त्यानंतरही सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आजपासून पुन्हा मनोज जरांगे यांनी अंतरावली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ठीक ठिकाणी आता मराठा समाजाच्या तरुणांमध्ये संताप व्यक्त होत असून सरकारला जाग आणण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत याच पार्श्वभूमीवर खर्डा येथील संतोष साबळे यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.