अहमदनगर दि.१५ सप्टेंबर
अहमदनगर शहरांमध्ये सोशल मीडियावर मराठा समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून सुशांत म्हस्के याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणावरून सध्या राज्यभर आंदोलन सुरू आहेत अनेक सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू असताना सोशल मीडियावर सुशांत म्हस्के याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करून व्हिडिओ व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून राजेंद्र पांडुरंग कोंडके यांनी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये सुशांत म्हस्के याच्याविरुद्ध दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
राजेंद्र पांडुरंग कोंडके यांच्या वरून सुशांत म्हस्के याच्या विरोधात भादवी कलम ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे करत आहेत.