HomeUncategorizedतृतीय पंथीयांनी मांडले महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठाण... अखेर सर्वसाधारण सभा तहकूब..

तृतीय पंथीयांनी मांडले महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठाण… अखेर सर्वसाधारण सभा तहकूब..

advertisement

अहमदनगर दि.१५ सप्टेंबर

अहमदनगर महानगरपालिकेत आज प्रचंड गदारोळ झाला कारण महानगरपालिकेच्या सभेत थेट तृतीयपंथीयांनी प्रवेश केल्यामुळे आणि मनपाची सर्वसाधारण सभा असूनही विविध विभागांचे जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे महानगरपालिकेची सभा अखेर तहकूब करण्यात आली.

अहमदनगर शहरात तृतीयपंथीयांची संख्या मोठी असून या तृतीयपांथिय नागरिकांसाठी स्मशानभूमीच नसल्याने अनेक वर्षांपासून स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी तृतीयपंथी संघटना सरकार दरबारी प्रयत्न करत आहे. महानगरपालिकेकडे सुद्धा अनेक वेळा त्यांनी अर्ज देऊन जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले होते.

आज अहमदनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती या सभेमध्ये विषय पत्रिकेवर तृतीयपंथीय नागरिकांसाठी जागा देण्याचा विषय घेण्यात आला होता मात्र सभा सुरू होण्याआधीच तृतीय पंथीयांनी थेट सर्वसाधारण सभेच्या सभागृहात प्रवेश करत नगरसेवकांच्या बसण्याच्या स्थानावर बैठक मारल्याने सभागृहात या विषयावर चांगला गदारोळ झाला. प्रशासनाने अनेक वेळा विनंती करूनही तृतीयपंथी सभागृहा बाहेर जात नसल्याने अखेर नगरसेवकांनी विनंती करून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. पुढच्या गणपतीला तसेच अहमदनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा असणारी शहरातील विविध प्रश्नांवर उत्तरे देण्यासाठी सभागृहात जबाबदार अधिकारीच अनुपस्थित असल्यामुळे नगरसेवक आणि उपायुक्तांची चांगलीच खडाजंगी झाली अखेर या गदरोळात नगरसेवकांनी केलेल्या मागणीवरून महापौरांनी सभा तहकूब केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular