Homeशहरमाऊली चौक,झोपडी कॅन्टीन परिसरातील बांधलेल्या इमारतील पार्कीगमधील अनाधिकृत बांधकाम तातडीने काढा..पक्के अतिक्रमणांबाबत...

माऊली चौक,झोपडी कॅन्टीन परिसरातील बांधलेल्या इमारतील पार्कीगमधील अनाधिकृत बांधकाम तातडीने काढा..पक्के अतिक्रमणांबाबत तक्रार दाखल असून सुद्धा महापालिकेची कारवाई नाही – अभिजीत खोसे

advertisement

अहिल्यानगर : सावेडी येथील झोपडी कॅन्टीन या इमारतीमध्ये मंजूर नकाशामधील जी पार्किंगची जागा आहे त्या पार्कीगच्या जागेमध्ये इमारत मालकाने सदरील जागा ही गोडाउन साठी भाड्याने दिलेली आहे व त्यामुळे या बिल्डीगला कोठेही पार्कीगची व्यवस्था नसल्यामुळे तेथे येणारे वाहनचालक हे रस्त्यावरच पार्कीग करत आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे याबाबत २०/१२/२०२४ रोजी आम्ही आपणास विनंती करून निवेदनाद्वारे याबाबत सदरील इमारती मध्ये पार्कीगची व्यवस्था नसल्यामुळे वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात त्यामुळे महामार्गावर वाहतुकीस अडथळा होत असल्याबाबत निर्देशनास आणुन दिले होते परंतु आपणमार्फत कोणत्याही पद्धीची कारवाई झालेली दिसून येत नाही. त्याचप्रमाणे या इमारतीच्या दोनही बाजूस असलेल्या इमारती या रोडच्या मध्यापासून जास्त अंतरावर असुन सदरील इमारत ही रोडपासून कमी अंतरावर बांधलेली दिसुन येत आहे. तरी इमारतीची मिळालेली मंजुरी ही योग्य आहे की नाही याची मोजमाप करून तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या कमर्शियल इमारतीमधील जागेची पट्टी ही कमर्शियल पद्धतीने होत आहे की नाही याचीही तातडीने खातरजमा करण्यात यावी. जेणेकरून महानगरपालिकेचा महासूल बुडणार नाही. सध्या अहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण मोहिम जोरात सुरु आहे. परंतु पक्के अतिक्रमण पाडणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील वाहतुक कोंडी मोकळी होऊ शकते. पक्के अतिक्रमणांबाबत तक्रारी दाखल असून सुद्धा महापालिकेद्‌वारे कारवाई होताना दिसत नाही.

स.न. १७५, F प्लॉट नं १७७, TPS NOIV वरील बांधलेल्या इमारतील पार्कीगमधील अनाधिकृत बांधकामाबाबत २०/१२/२०२४ रोजी सावेडी येथील माऊली चौकातील सदारील इमारतीच्या पार्कीगबाबत दिलेल्या तक्रार अर्जावर आपण कोणत्याही पध्दतीची ठोस कारवाई केलीली दिसून येत नाही याचाच अर्थ महापालिका प्रशासनाच्या वतीने अहिल्यानगर शहरातील पक्के अतीकमणांना अभय मिळते की काय असा नगरकरांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे सदरील इमारतीवर आपण तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्हांला तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल. असा इशारा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी निवेदनाद्वारे दिला या वेळी इं.केतन क्षीरसागर, सुमित कुलकर्णी, सोमनाथ जाधव आदी उपस्तित होते

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular