अहिल्यानगर दिनांक 29 डिसेंबर
केवळ 3 किलोमीटर साठी नगरकरांना 40 किलोमीटरचा टोल भरावा लागत आहे.नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या रिंग रोडचे काम पूर्ण झाले आहे.या रोडवरून जाणाऱ्या वाहनांसाठी आता टोल टॅक्स भरूनच पुढे जावे लागते.मात्र आता प्रश्न असा आहे की पुण्यावरून नगर शहरात कल्याण रोड मार्गे नेप्ती नक्या पर्यंत येण्यासाठी अथवा नगर शहरातून कल्याण रोड मार्गे पुणे रोडवर जाण्यासाठी तब्बल 80 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. तर या महामार्गावर राहणाऱ्या कोणत्याच नागरिकांना यातून सुट नाही कंपनीने या ठिकाणी पास ची सुविधा ठेवलेली आहे मात्र तो पास ही तीनशे रुपयांच्या पुढे आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनाही पैसे भरावेच लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या रोडवर टोल नाका (toll plaza) सुरू झाला आहे.
नगर शहरातून उदरनिर्वाहासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणारे छोटे मोठे रिक्षा टेम्पो, मालवाहू टेम्पो, यांनाही नाहक या ठिकाणी टोल भरावा लागतो. हातावर पोट असणाऱ्या या मालवाहू रिक्षा चालकांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित राहतोय. एवढेच नव्हे तर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या मुलांना शाळेत घेऊन येण्या-जाण्यासाठी असणाऱ्या स्कूल बसला ही टोल भरावा लागतोय.
नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या या रिंग रोडने सोलापूर, मनमाड,शिर्डी तसेच बीड, पाथर्डी, पुणे, दौंड छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी वाहनांची ये जा सुरू असते. 16 डिसेंबर पासून वाहन चालकांकडून टोल वसुली सुरु केली गेलीय. यामुळे स्थानिकांना आता टोल दिल्याशिवाय पर्याय उरला नाही. सर्व स्थानिक वाहनांकडून ही टोलवसुली करण्यात येत आहे.
मात्र या प्रश्नाबाबत अद्यापही कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने अथवा सामाजिक संघटनेने आवाज उठवलेला नाही त्यामुळे स्थानिक नागरिक मुकाट्याने तीन किलोमीटरसाठी 80 रुपयांचा टोल भरून सध्यातरी या रस्त्यावरून ये जा करताना दिसून येत आहे.
तर टोल सुरू झाल्यानंतर काही गुंडांनी वाहने या टोल नाका रोड वरून जाण्यासाठी वाहन धारकांवर बळजबरी केल्याचा प्रकारही समोर आला होता. याप्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत अद्याप पोलिसांनी कोणत्याही आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे अजूनही असे प्रकार चालू असेल याचा भुर्दंड वाहनधारकांनाच होत असल्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर त्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी अशी मागणी समोर येत आहे.