अहमदनगर दि.२१ नोहेंबर
अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेल्या चोरीच्या तपासाच्या दिरंगाईच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन देऊन दिला आहे.
अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले आडते बाजार, डाळमंडई, एम. जी. रोड व त्या लगतचा सर्व परिसरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण हे वाढत चालले असून पोलीस प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे उपाययोजना किंवा चोऱ्या कशा रोखता येतील याबाबत कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही तसेच ज्या चोऱ्या झाल्या आहेत. त्याबाबतीत योग्य असा तपास होऊन आरोपी अटक झालेले नाहीत. तसेच ११ नोहेंबर रोजी व्यापारी प्रताप हिरानंदानी यांना मारहान करून त्यांच्याकडील त्यांची पैश्याची बॅग हिसकावून घेऊन काही चोरटे पळून गेले होते. त्याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून तसाच काहीसा प्रकार हा दिपक आहुजा यांच्या बाबतीत डाळमंडई परिसरात घडला होता. त्यात ही त्यांना मारहान करुन त्यांच्या ही पैश्याची बॅग हिसकावून चोरली होती.
तसेच या चोऱ्यांसारखे भरपूर प्रकार सध्या बाजारपेठ परिसरात घडत आहेत, आजपावेतो सदर चोरीचा उलगडा पोलीस प्रशासनाकडून झालेला नसून सदरचे आरोपी हे आज ही मोकाट फिरत आहेत.
अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी हे आज या वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे भयभीत झाले असून त्यांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी होताना दिसत आहे. सदरच्या चोऱ्यांच्या प्रकारातून एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसून काही महिन्यापूर्वी अहमदनगर
शहरालगतच चोरीच्या घटनेतूनच खूनासारखी गंभीर घटना घडली होती. अशी एखादी घटना घडण्याची
वेळ पुन्हा येऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून काही तरी ठोस उपाययोजना करण्याची आता वेळ
आली असून सदर बाजारपेठेतील चोऱ्यांच्या बाबतीत जर तपास लवकरात लवकर लागावा अन्यथा मंगळवार २८ नोहेंबर पासून अहमदनगर शहरातील मुख्य बाजार पेठेत उपोषण करणार असल्याचं इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन आपण पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांना दिले आहे. यावेळी मुख्यबाजार पेठेतील व्यापारी राजुसेठ चोपडा,प्रताप भारद्वानी, दिनेश रंगलानी, किशोर रंगलानी, अजिंक्य बोरकर, जयकुमार रांगलानी आदी व्यापारी उपस्थित होते.