HomeUncategorizedलालटाकी ते कापड बाजार पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची चाळण... इथून जाणारा प्रत्येक नागरिक...

लालटाकी ते कापड बाजार पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची चाळण… इथून जाणारा प्रत्येक नागरिक महानगरपालिका आणि नगरसेवकांच्या नावाने चांगभलं करतच असणार…. मनपाचे मुख्य अभियंत्यांना या रस्त्यावरून दुचाकीवर बसवून दहा वेळा चक्कर मारून वस्तुस्थिती दाखवण्याची गरज…

advertisement

अहमदनगर दि.२० नोहेंबर

अहमदनगर शहरातील काही रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. चालणे तर मुश्किलच आहे आणि दुचकीवर चालणे म्हणजे शरीरातील हाडे खळखळी करून घेणे आणि एखाद्या अपघाताला निमंत्रण देण्यासाठी आहे. चार चाकी वाहनांचे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नुकसान तर होतेच मात्र नागरिकांच्या शरीराचेही मोठे नुकसान होत आहे.

नगर शहरात काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहेत मात्र हे होत असतानाच काही ठिकाणी अनेक दिवसांपासून रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र या प्रभागातील नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष आहे. लालटाकी येथून कापड बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती पाहिली तर या रस्त्याची संपूर्ण चाळण झालेली आहे. लालटाकी येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोरून जो रस्ता सुरू होतो तो सर्जेपुरा मार्गे कापड बाजार पर्यंत जातो मात्र या रस्त्यावरून चालताना नागरिकांना फार जपून चालावे लागते. कारण मोठमोठे खड्डे अतिक्रमण आणि यामधून रस्ता शोधत जाणे मोठ्या मुश्किलीचे काम असते. चार चाकी असो दुचाकी असो अथवा पायी चालणारा माणूस असतो या ठिकाणी जाताना प्रत्येकाच्या तोंडून एकदा तरी नगरसेवकांच्या आणि महानगरपालिकेच्या नावानं चांगभलं हा शब्द निघतच असेल एवढी दयाने परिस्थिती या रस्त्याची झाली आहे. मात्र या रस्त्याकडे लक्ष देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन अथवा नगरसेवक यांना वेळच भेटत नाही असे दिसतेय.

सावेडी उपनगर एमआयडीसी परिसरातून शहरात मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी हा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड रहदारी असते. लाल टाकी परिसरात झालेली अतिक्रमणे आणि रस्त्यावर पार्किंग करण्याची पद्धत नगरमध्ये असल्यामुळे रस्ता अरुंद होत असतो त्यात रस्त्यावरील खड्डे यामुळे रस्ता शोधत शोधत नागरिकांना या ठिकाणी प्रवास करावा लागतो. मात्र या संपूर्ण गोष्टीकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसते त्यामुळे लाखो रुपयांचा कर भरूनही नागरिकांना विविध आजारांना निमंत्रण देण्यासाठी हा रस्ता सध्या खुला आहे. ज्या नागरिकांना आपल्या शरीराचे हाडे खीळ खिळे करून घ्यायचे असतील त्या नागरिकांनी निश्चितच या रोडवरून प्रवास करावा म्हणजे महानगरपालिकेच्या नावानं चांगभलं हा एकदा तरी शब्द आपल्या तोंडून आल्या शिवाय राहणार नाही.

या रस्त्यांवरून महानगरपालिकेचे मुख्य अभियंता यांना दुचाकी वर बसून दहा वेळा चक्कर मारावी म्हणजे त्यांना कळेल की नागरिकांना किती त्रास होत असेल लाखो रुपयांचा पगार घेऊन महानगरपालिका प्रशासन मधील अधिकारी अशा गोष्टींकडे लक्ष देत नसतील तर ते फक्त एसी मध्ये बसून खुर्ची उबवण्याचे काम करतात का असा सवाल आता उपस्थित होतेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular