Homeशहरहिंदु जनसेवक आमदार संग्राम जगताप...

हिंदु जनसेवक आमदार संग्राम जगताप…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 17 डिसेंबर

आज अहिल्या नगर शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बजरंग दल तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या गोमांस तस्करी बद्दल आणि गोमांस कापणी करणारे कत्तलखाने बंद करावे यासाठी निवेदन दिले यावेळी अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप यांनी प्रथमच हिंदुत्ववादी संघटनांबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन गोमांस तस्करी आणि गोमांस कत्तलखाने बंद करावे अशी भूमिका परखडपणे मांडली. नगर शहर नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा अशा अवैद्य गोमांस तस्करी पासून आणि कत्तलखान्यांपासून मुक्त करावा अशी आग्रहाची मागणी ही त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश शोला यांच्याकडे केली.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून गोमांस जप्त करत आहेत. मात्र अजूनही अनेक अनधिकृत गोमांस तस्करीचे कत्तलखाने सुरूच आहेत. हिंदू धर्मामध्ये गाईला देवाचे स्थान असताना अशा गाईची कत्तल करून ठराविक वर्ग त्यांचे मांस सेवन करतात त्यामुळे हिंदू धर्मियांची भावना दुखण्याचा हा प्रकार असून 36 कोटी देवदेवतांचे स्थान म्हणून हिंदू धर्मात गाई ही पवित्र स्थानी मानले जाते मात्र त्यास गायीची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहणे कोणत्याही हिंदू बांधवाला शक्य नाही याच भावनेतून नगर शहर नव्हे तर संपूर्ण नगर जिल्हा गोमांस तस्करीमुक्त आणि अवैध कत्तलखाने बंद करून सर्व कत्तलखाने भुई सपाट करावे अशी मागणीही आमदार संग्राम जगताप यांच्यासह बजरंग दलाने केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular