Homeराज्यआ.निलेश लंके यांच्या आईला अश्रू अनावर...

आ.निलेश लंके यांच्या आईला अश्रू अनावर…

advertisement

अहमदनगर दि.९ डिसेंबर

अहमदनगर जिल्ह्यातील नगर सोलापूर,नगर पाथर्डी,नगर कोपरंगाव रस्त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला विविध स्थरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते संघटनेचे नेते आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन सहभागी होत आहेत मात्र आज तिसऱ्या दिवशी एका व्यक्तीची उपस्थिती ठळकवणे जाणवली ती म्हणजे निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला ज्ञानदेव लंके यांची.

 

आमदार होण्याआधी पासूनच निलेश लंके कार्यकर्त्यांच्या कामाला नेहमीच प्राधान्य देत असतात त्यामूळे घरातील व्यक्तींना माहिती आहे. मात्र उपोषणाला सुरुवात झाली तेव्हा काही वाटले नाही मात्र गुरुवारी रात्री झोपच लागली नाही त्यामुळे सकाळीच उठून उपोषण ठिकाण गाठून लेकराला नजरेखाली घातले अशी भावना निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला ज्ञानदेव लंके यांनी बोलून दाखवली.  सरकार याकडे लक्ष देत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

उपोषण आंदोलन हे आमदार लंके यांच्या घराला नवीन नाही मात्र आपलं लेकरू तीन दिवसांपासून उपाशी आहे तर त्या माऊलीला झोप कशी लागेल.सरकारने यातून मार्ग काढायला पाहिजे अशी भावना शकुंतला ज्ञानदेव लंके यांनी बोलून दाखवली.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular