अहमदनगर दि.१० डिसेंबर (सुशीलकुमार थोरात)
चार दिवसांच्या उपोषणानंतर अखेर रस्त्याचे महामार्गाचे काम सुरू झाल्यावर निलेश लंकेने उपोषण सोडले मात्र या चार दिवसात अहमदनगर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना निलेश लंके यांच्यासारख्या नवख्या आमदाराने राजकारणाचा एक चांगला धडा दिला. अहमदनगरच्या इतिहासात आजपर्यंत अनेक वेळा राजकारणी लोकांनी उपोषणाचे इशारे दिले आंदोलन केली मात्र राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आमरण उपोषण करून राजकारणात एक वेगळाच इतिहास घडवला आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अहमदनगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व आहे. याच वर्चस्वाला कुठेतरी धक्का देण्याचं काम आमदार निलेश लंके यांनी केल आहे. निलेश लंके यांचा उपोषण हे रस्त्यासाठी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी होते. मात्र यामुळे भाजप विरोधी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना एक मोठं बळ मिळालं.
काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाच्या शुभारंभासाठी केंद्रीय रस्ता बांधणी मंत्री नितीन गडकरी आले होते.त्यावेळी त्यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी नगर पाथर्डी विशाखापट्टणम या महामार्गाचे काम पूर्ण झाले असल्याचा उल्लेख केला मात्र ही खोटी माहिती त्यांना कोणी दिली अथवा कोणी द्यायला लावली हा एक मोठा प्रश्न समोर आला असून आमदार निलेश लंके यांनी उपोषण करून रस्त्याची खरी वस्तुस्थिती समोर आणल्या नंतर हा खोटेपणा उघड पडला आहे. आमदार निलेश लंके यांच्यासारख्या आमदाराने लोक प्रश्नासाठी उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाने या उपोषणाची दखल घेऊन पहिल्याच दिवशी उपोषणा स्थळी भेट देणे गरजेचे होते मात्र थेट तिसऱ्या दिवशी स्वतः जिल्हाधिकारी या ठिकाणी भेट देऊन निलेश लंके यांचे उपोषण सोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र तीन दिवस एकही अधिकारी या ठिकाणी फिरला नाही त्यामुळे त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? कारण निलेश लंके हे आमदार असूनही प्रशासनाने त्यांची गंभीर दखल का घेतली नाही असे अनेक नानाविध प्रश्न कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्या भाषणादरम्यान विचारले!
आमदार निलेश लंके यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते अखेर चौथ्या दिवशी उपोषण सोडले उपोषण सोडल्यानंतर त्यांनी आभार व्यक्त करताना भाषणात खासदार विखे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता चांगलीच टीका केली “खासदार विखे यांनी काही दिवसांपूर्वी नगर मनमाड रस्त्याचे काम हे टक्केवारीमुळे थांबले असल्याची टीका केली होती त्याला उत्तर देणार ना आज निलेश लंके यांनी सांगितले की जर आम्ही टक्केवारी मागितले असेल तर आम्ही या ठिकाणी लगेच राजीनामा देऊ मात्र सर्व चौकशांती तुमच्या बाबत हा प्रकार घडला असेल तर तुम्ही राजीनामा देणार का जिल्ह्यातील राजकारण हे कशा प्रकारे सुरू आहे हे आता सर्वांना दिसू लागले आहे. निलेश लंके यांच्या समर्थनार्थ पाच-दहा लोकांनी रस्ता रोको केला तर त्या ठिकाणी जे लोक उपस्थित नाहीत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे असा हा सूडबुद्धीचा खेळ सध्या नगर जिल्ह्यात सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्तव्य शून्य माणसाबद्दल मला काही बोलायचं नाही समाजासाठी त्यांचा काही त्याग नाही अशा लोकांबद्दल मी काही बोलणार नाही काही लोकांचे सध्या कामच आहे फक्त म्हणायचं मी लई मोठा नेता आहे व्हाट्सअप वर क्लिक तयार करायची आणि ती व्हायरल करायला लावायची जे सध्या त्यांचं काम आहे. समाजासाठी तुमचं काहीच काम नाही तुम्ही सगळे टक्केवारी वाले नेते खालपासून ते वरपर्यंत सर्वांचाच काढलं तर सर्वच टक्केवारीवाले दिसतील.स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे यांचं काम. हे सगळे मोठे लोक नाही तर खोटे लोक आहेत.कोणत्या ठेकेदारावर किती दबाव आणला हे सगळे गोष्टी आम्हाला माहित आहे. यांचे काळे धंदे झाकण्यासाठी आम्हाला हे आत्मक्लेष आंदोलन करावा लागले. कोविड काळातही अनेक वेळा माझ्यावर टीका झाली मात्र मी कोणाच्याही टीकेला उत्तर दिले नाही आरोग्य सेवेचे काम मी करत राहिलो काही लोक म्हणत राहिले की निलेश लंके स्टंटबाजी करतो मात्र मी 30 हजार लोकांची सेवा केली तुम्ही एकही कोविड सेंटर उघडले का? आणि तुम्ही त्याकाळी रेमडीसीवर किती हजारांना विकले याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. अशी टीका आमदार निलेश लंके यांनी समारोपेच्या भाषणात केली.
चार दिवसाच्या आंदोलनात निलेश लंके यांनी गमावलं तर काहीच नाही मात्र कमल भरपूर आहे.विशेष म्हणजे कोपरगाव पासून ते पाथर्डी पर्यंत आणि इकडे मिरजगाव पर्यंत सर्वच गावागावात निलेश लंके यांच्या उपोषणाची चांगलीच जोरदार चर्चा झाली कारण याच गावातील लोकांना या रस्त्याचा मोठा त्रास होत होता आणि त्याच प्रश्ना साठी आमदार लंकेही उपोषणाला बसले होते त्यामुळे या चारही मार्गावरील ग्रामस्थांनी निश्चितच प्रत्यक्ष नाही मात्र अप्रत्यक्ष या उपोषणाला पाठिंबा दिलाच असेल त्यामुळे आमदार लंके यांनी भरपूर काही कमावले आहे. मात्र प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देण्याचं काम एका सामान्य आमदाराने केलं हा एक मोठा चर्चेचा विषय आहे.