अहमदनगर दि.११ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यातील विविध महामार्गांचे दयनीय अवस्था झाली होती याबाबत आवाज उठून गेल्या चार दिवसांपासून पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. अखेर हे उपोषण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या फोनवर झालेल्या चर्चेनंतर सोडण्यात आले.
यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी करण्याची विनंती केली या विनंतीला मान देत अजित पवार यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय नजरेखालून घातले. विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीची त्यांनी माहिती घेतली, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापासून सभागृहातील खुर्चीपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांनी हाताळून पाहिली आणि हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय नव्हे तर एखाद्या सरकारी कंपनी सारखे कॉर्पोरेट कार्यालयात आल्या सारखे वाटतंय असेही म्हणले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातील खुर्चीवर बसून किती आरामदायी आहे तसेच भिंतीला दिलेला रंग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेले विविध शिल्प याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यावेळी उपस्थित होते.
नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून उभा राहिली होती दोन वेळेस जेव्हा बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्र्यांची धुरा घेतली तेव्हा दोन्ही वेळेस त्यांनी या वास्तूला भरघोस निधी दिला होता. मधल्या काळात ही वास्तू पूर्ण झाल्यानंतर आतील फर्निचर साठी निधी कमी पडत असल्याने तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो निधी उपलब्ध करून दिला होता यासाठी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मोठा पाठपुरावा केला होता त्यामुळे ही वास्तू एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस सारखी असल्याचा आणि संपूर्ण ऑफिस पाहिल्यानंतर व्हेरी गुड असा शेरा दिला आहे