अहिल्यानगर :
अहिल्यानगर शहरात विविध विकासकामांना वेग मिळत असून अनेक भागांमध्ये सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मागील अनेक वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणुकांना खड्डेमय व खराब रस्त्यांचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळी वातावरणात रस्त्यांवरील खड्डे, चिखल आणि वाहतुकीची कोंडी यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असे. मात्र यावर्षी शहरातील अनेक प्रमुख मार्ग सिमेंट काँक्रिट रस्त्यांनी सज्ज झाल्याने विसर्जन मिरवणुकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर होणार आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच मूलभूत सुविधांवर भर देत रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाच्या कामांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची सुधारलेली स्थिती ही विकासकामांची प्रचिती देणारी असल्याचेही अनेक नागरिकांनी सांगितले. “फक्त धार्मिक कार्यक्रमांनाच प्रोत्साहन नाही, तर विकासकामांमधूनही शहराच्या प्रगतीची दिशा ठरविण्याचा प्रयत्न होत आहे,” अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.
गणेशोत्सव हा शहरातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होत असतात. पूर्वी रस्त्यांवरील खड्डे, पावसामुळे साचलेले पाणी आणि खराब झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे मिरवणुकांचा वेग मंदावत असे. यंदा मात्र परिस्थिती बदललेली दिसून येत आहे. सिमेंट काँक्रिट रस्त्यांमुळे विसर्जन मार्ग अधिक सुरक्षित, सुकर आणि आकर्षक बनले आहेत.
यंदा गणेश विसर्जन मिरवणुका सिमेंट काँक्रिट रस्त्यांवरून मार्गक्रमण करणार असल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून शहराच्या विकासाचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
शहरातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार संग्राम जगताप यांच्या सततच्या पाठपुरावामुळे जुने नगर शहर आता आपले रूप बदलत असून गल्ली बोळातही सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनत आहेत. तर सावेडी,केडगाव उपनगरात अनेक मोठमोठे रस्ते झाल्याने या उपनगरांचा कायापालट झाला आहे. गेल्या 40 वर्षातही जो विकास नगरकरांनी पाहिला नाही तो विकास नगरकरांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकाळात पाहिला आहे.इतिहासाच्या विकासाच्या पानात आमदार संग्राम जगताप यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल कारण शहराला विकासाची दिशा देणारा आमदार म्हणून संग्राम जगताप यांचे नाव संपूर्ण नगरकरांच्या तोंडी घेतले जात आहे.



