Home क्राईम गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज;४९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज;४९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

3
Oplus_0

📰 खबर अहिल्यानगरची

📍 अहिल्यानगर | प्रतिनिधी
आगामी श्री गणेशोत्सव व नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखत साजरा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने व्यापक तयारी केली आहे. जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३(१) अंतर्गत आदेश जारी करून गणेशोत्सव व नवरात्रोत्सव कालावधीत डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापरावर बंदी घातली आहे.

👮 ४९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
शहर उपविभागात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
त्याअंतर्गत—
३८३ जणांकडून शांतता राखण्यासाठी बंधपत्र घेण्यात आले.
अवैध मद्यविक्रीशी संबंधित २१ जणांवर कारवाई करण्यात आली.
४ जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.
एकूण ४५ शांतता समिती, मोहल्ला समिती, गणेश मंडळे, धर्मगुरू, वाद्यधारक, मूर्तिकार आणि इतर घटकांच्या बैठका घेण्यात आल्या.

🚔 विशेष पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सव काळात शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांमध्ये १८ अधिकारी, १७५ पोलीस अंमलदार आणि १३५ होमगार्ड असा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय कोंबिंग ऑपरेशन, रूट मार्च, मॉब ड्रिल आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत देखरेख ठेवण्यात येणार आहे.

🗞️ ठळक मुद्दे
✅ गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात डॉल्बी सिस्टीमवर बंदी
✅ आदेश १४ सप्टेंबर ते २० ऑक्टोबरपर्यंत लागू
✅ ४९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
✅ १८ अधिकारी, १७५ पोलीस, १३५ होमगार्ड तैनात
✅ संवेदनशील भागांवर विशेष लक्ष

🔊 डॉल्बी सिस्टीमवर पूर्ण बंदी
अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी जारी केलेल्या आदेशानुसार १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या गणेशोत्सव कालावधीत तसेच ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या नवरात्र-दसरा उत्सव काळात मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीम, उच्च क्षमतेचे ध्वनीवर्धक किंवा तत्सम उपकरणांचा वापर, भाड्याने पुरवठा अथवा उपलब्ध करून देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे वृद्ध, रुग्ण, गर्भवती महिला, लहान मुले व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच ध्वनीप्रदूषणामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

— खबर अहिल्यानगरची

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here