अहमदनगर दि.१८ नोव्हेंबर –
शहरातील अनेक वर्षाचे विकासाचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू केले असल्यामुळेच शहर विकासाला चालना मिळाली आहे मूलभूत प्रश्नांपासून कामे करावी लागत आहेत ती कामे नियोजनबद्ध व कायमस्वरूपी होत आहे शहराचे रूप आता बदलू लागले आहे विकास कामांमध्ये नगरकरांनी सहभाग नोंदवावा केडगाव येथील अवधूत मोबाईल अँड इलेक्ट्रिकल्स शोरूमने पुढाकार घेऊन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे नगरसेवक मनोज कोतकर यांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता पुतळ्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते व विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाता येतो. शोरूम चे संचालक अजित पवार यांनी सामाजिक कामाचा घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

केडगाव येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरणाचे काम अवधूत मोबाईल अँड इलेक्ट्रिकल्स शोरूम च्या वतीने सुरू करण्याचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. समवेत नगरसेवक मनोज कोतकर, मोबाईल शॉपी चे संचालक अजित पवार, महाराष्ट्र राज्य मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, भूषण गुंड, जालिंदर कोतकर, गोरख पडोळे,हिरा शेट, संतोष बलदोटा, प्रितम तोडकर,रितेश सोनीमेंडलेचा,अतुल रच्चा,दादा दरेकर,सुरज कोतकर, महेश सातपुते,सोनू घेमुड, माऊली जाधव, योगेश राऊत, बाबासाहेब कोतकर, बाळासाहेब वायकर, दत्ता कोतकर, नरेश राणा, सचिन पोखरणा,विकास साठे, पप्पू वीरकर, प्रकाश चंगेडिया,आदी उपस्थित होते.
नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की केडगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व मा. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा परिसरतील उद्यान नादुरुस्त झाले होते याचे सुशोभीकरण व्हावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांनी तातडीने या गोष्टीकडे लक्ष घालून अवधूत मोबाईल शॉपीचे संचालक अजित पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुशोभीकरण काम करण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी तातडीने आर्किटेक इंजिनियर्स नेमून आराखडा तयार केला व आज प्रत्यक्षात सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली लवकरच हे उद्यान केडगावकरांच्या पसंतीस उतरेल व केडगावच्या सुशोभीकरणासाठी पाठपुरावा सुरू राहील असे ते म्हणाले.
अजीत पवार म्हणाले की,आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून पुढाकार घेत आपले कर्तव्य बजावण्याचे काम केले आहे आ.संग्राम जगताप व नगरसेवक मनोज कोतकर यांच्या मागणीनुसार हे उद्यान भव्य दिव्य व आकर्षक केले जाईल सुशोभीकरणाचे काम नक्कीच केडगावकरांच्या पसंतीस उतरेल असे ते म्हणाले.
अजीत पवार म्हणाले की,आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून पुढाकार घेत आपले कर्तव्य बजावण्याचे काम केले आहे आ.संग्राम जगताप व नगरसेवक मनोज कोतकर यांच्या मागणीनुसार हे उद्यान भव्य दिव्य व आकर्षक केले जाईल सुशोभीकरणाचे काम नक्कीच केडगावकरांच्या पसंतीस उतरेल असे ते म्हणाले.