अहमदनगर दि.१८ नोव्हेंबर
आपल्या वक्तव्य आणि कृतीमुळे सदैव चर्चेत राहणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे (Raosaheb Danve) हे नेहमीच चर्चेत राहतात.
अहमदनगर शहरातही असाच एक किस्सा घडला असून गुरुवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे अहमदनगर शहरात आले होते अहमदनगर ते आष्टी दरम्यान न्यू डेमु रेल्वेचा त्यांच्या हस्ते शुभारंभ होता मात्र त्याआधी ते भाजपचे माजी मंत्री माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी जाणार होते आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील,आमदार मोनिकाताई राजळे, आमदार पाचपुते यांच्या सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रावसाहेब दानवे यांची वाट पाहत ताटकळत उभे होते. रावसाहेब दानवे यांचा नियोजित दौरा आणि वेळ यामध्ये मोठी ताफारवत झाल्यामुळे जवळपास दोन ते अडीच तास सर्वांना रावसाहेब दानवे यांची वाट पाहावी लागली होती. अखेर रावसाहेब दानवे हे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी येताच गाडीतून उतरले उतरल्यावर शिवाजी कर्डिले यांनी त्यांना सांगितले की खूप वेळ झाले आम्ही वाट पाहतोय त्यावर शांत बसणार ते रावसाहेब दानवे कसले त्यांनी लगेच मिश्किल टिप्पणी करत सांगितले की नगर शहरात तीन तास झाले मी फिरत असून मला तुमचे घर सापडत नव्हते अखेर एका रिक्षावाल्याला विचारल्यानंतर त्यांनी सांगितले बुऱ्हानगर मध्ये कर्डीले राहतात तेव्हा मला तुमचे घर सापडले असे उत्तर त्यांनी यावेळी दिले आणि एकच हास्यकल्लोळ उडाला.
पहा व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा 👇https://youtu.be/6ts8DpqBXJQ
केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दिलखुलास असा स्वभाव आहे. त्यांच्या स्वभावामुळे जालना जिल्ह्यात, तसेच महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे.