Home Uncategorized आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढल्या नंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप आमचा...

आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढल्या नंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप आमचा मुसेवाला झाला तर जबादारी तुमचीच तर आता बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक पुण्यातील या आमदाराच्या ऑफिसची तोडफोड

मुंबई दि.२५ जून

शिवसेनेतील बंडखोरीचे प्रकरण आता चांगलेच टोकाला पोहोचली असून बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलीच तोफ डागली आहे.

राज्यातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढण्यावरून पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली असून आमच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर काही बरेवाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील असेही एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या एका पत्रकात म्हटले आहे. सुरक्षा काढून घेतल्याने आमच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असून मुख्यमंत्री आदेशानंतर आमदारांच्या कुटुंबातील लोकांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आमचा मूसेवाला करण्याचा डाव असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.पंजाब मध्ये मूसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर काय प्रकार घडला होता हे ज्ञात असतानाही आमच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून का घेतली असा सवाल त्यांनी केला आहे.

तर दुसरीकडे आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक होत असून बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना पुणे येथे घडली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाचे तोडफोड कार्यकर्त्यांनी केली असून राज्यातील परिस्थिती बिघडली तर राष्ट्रपती राजवट लागू होईल असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version