राज्य दि.२७ एप्रिल
औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होणार असून या सभेच्या ठिकाणाची पाहणी आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी औरंगाबाद येथे जाऊन केली. त्याआधी काही वेळ औरंगाबादच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही सभास्थळाची पाहणी केली असल्यामुळे या सभेला जवळपास परवानगी मिळाली असल्याचे चिन्हे आहेत.
तर दुसरीकडे मनसे च्या आणि भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आता महाविकास आघाडीच्या वतीने पुणे येथे एक मे रोजी सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बडे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याचे समजते आहे.