अहमदनगर दि.९ जुलै
कोतवाली पोलिसांनी चोरीला गेलेले व गहाळ झालेले महागडे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तांत्रिक बाबींचा तपास करून चोरी गेलेले १९ मोबाईल हस्तगत केले. दोन लाख ९३ हजार ३०० रुपये किमतीचे मोबाईल तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केले आहेत. गेल्या दोन महिन्यात साडेचार लाख रुपये किमतीचे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आले असून, कोतवाली पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून मोबाईल शोधण्याचे आदेश कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला दिले होते. कोतवाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीला गेलेले १९ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. चोरीतील मोबाईल परत मिळाल्यावर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, तक्रारदारांना कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले. चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग या कंपनीचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोना सलीम शेख, राजेंद्र फसले व दक्षिण मोबाईल सेलचे प्रशांत राठोड यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.
मोबाईल यांना मिळाले परत
दिलीप रंगनाथ गोरे (रा.आगरकर मळा) दत्तात्रय मधुकर बेट्टी (रा.सर्जेपुरा), लहानू मारुती उमाप (रा.केडगाव), धीरज छोटेलाल लड्डा (रा.आडते बाजार), शेख सादिक अलाउद्दीन (रा.खाटीक गल्ली), ऋतिक राजेंद्र वाघ (रा.हातमपुरा), समीर फाटक (रा.शनि चौक अहमदनगर), भीमा सकट (रा.रेल्वेस्टेशन, अहमदनगर), शंकर गावडे, तुषार खराडे (रा.राळेगण म्हसोबा,अ.नगर), रिजवान खान (रा. अहमदनगर), राजेश शिरसाट (रा.अहमदनगर), करनाराम भांड (रा. जोधपूर, राजस्थान), सागर जाधव (रा.अहमदनगर), जय शिंदे (रा. नाशिक),
मेहुल सोनी (रा.अहमदाबाद, गुजरात), राजू आहेर, (अहमदनगर), प्रताप थोरात (रा.अहमदनगर),वैशाली कांडेकर (रा. हिंगणगाव, अ.नगर), यांना मोबाईल फोन परत देण्यात आले.