Homeक्राईमखासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतरही परिस्थिती जैसे थे ... तरुणाईला कॅन्सरच्या विळख्यात...

खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतरही परिस्थिती जैसे थे … तरुणाईला कॅन्सरच्या विळख्यात ओढणारा मावा गुटखा आणि तरुणाईचे वाटोळे करणारे कॅफे आणि लॉज अद्यापही सुरूच…

advertisement

अहमदनगर दिनांक 27 जुलै
लोकसभेचे खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अवैद्य धंधांविरुद्ध सुरू केलेल्या आंदोलनानंतर असे वाटत होते की आता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांचे उच्चाटन होईल मात्र अजूनही पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे जोरात सुरू आहेत.खा. निलेश लंके यांनी उपस्थित केलेल्या कॅफे, अवैध गुटखा, मावा आणि लॉजचे धंदे अजूनही सुरू असून या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही अथवा पोलीसही यांच्यावर कारवाई करताना दिसत नसल्याने आजही हे धंदे राजरोसपणे सुरू आहेत.

मावा आणि गुटखा या मुळे तरुणाई कॅन्सर सारख्या रोगाच्या विळख्यात गुरफटत चालली असून त्याचबरोबर कॅफे आणि लॉजमुळे शाळा कॉलेजमधील मुलं शिक्षण सोडून कॅफे आणि लॉजवर जाताना दिसत आहेत अक्षरशः शाळा आणि कॉलेजच्या ड्रेसवर मुलं मुली लॉजवर आणि कॅफेमध्ये जाताना चे चित्र अहमदनगर जिल्ह्यात सर्वात दिसून येत आहे.

खासदार निलेश लंके यांनी जाहीर केलेल्या आकड्यानुसार मावा, गुटखा यांच्यापासून पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता मिळतो तर लॉज आणि कॅफेमधूनही मोठ्या प्रमाणात हप्ते वसूल केले जातात असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला होता. मात्र तीन दिवसाच्या उपोषणानंतर आता हे सर्व अवैध धंदे बंद होतील असे वाटत असताना अवैद्य धंद्यावाल्यांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही लॉज, गुटखा, मावा आणि कॅफे हे सर्रास सुरू आहे त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी उपोषण करूनही काही उपयोग झाला नाही का? असा प्रश्न आता समोर येतोय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular