Homeजिल्हाअबब... आता हे रेट कार्ड सोशल मीडियावर चांगलेच होते व्हायरल...सहा कोटी चार...

अबब… आता हे रेट कार्ड सोशल मीडियावर चांगलेच होते व्हायरल…सहा कोटी चार लाख 60 हजार रुपयांचा अवैद्य जिझिया कर कोणाच्या खिशात…

advertisement

अहमदनगर दिनांक २६ जुलै
अहमदनगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर चार दिवस उपोषण करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या बाबत पोलखोल केली होती यावेळी त्यांनी काही पोलीस कर्मचारी कसे हप्ते घेतात याचीही पोलखोल केली होती या गोष्टीला बारा तास उलटत नाही तोच आता उत्पादन शुल्क विभागाच्या हप्तेखोरीचे आकडे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

जिल्ह्यातील परमिट रूम धारक दरवर्षी आपल्या परवान्याचे शासकीय फी भरून नूतनीकरण करत असतात मात्र छोटा मोठ्या चुका दाखवून आणि नियमांचा धाक दाखवत सध्या उत्पादन शुल्क आपले
उखळ पांढरे करत असल्याने परमिट रूम धारक चांगलेच वैतागले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात अनेक बियर बार धारक राज्य
शासनाला मोठ्या प्रमाणात शुल्क देत असतात मात्र
अनधिकृतपणे हॉटेल धाबेवाल्यांना उत्पादन शुल्क
जाणीवपूर्वक पाठीशी घालून या अधिकृत बियरबार
वाल्यांना वेठीस धरत असल्याचे बोलले जात आहे. तर
बार असोसिएशनच्यावतीने आवाज उठवला तर त्या बारvमालकाला लक्ष केले जाते व जाणीवपूर्वक त्रासही दिला जातो अशी माहिती काही बार मालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सोशल मडेवार सध्या व्हायरल होत असलेल्या हप्ते खोरीचा तक्ता खालील प्रमाणे

अहमदनगर जिल्ह्यात परमिटरूम 800 दर महिन्याला तीन हजार रुपये महिना हप्ता त्याचे होतात
2400000
अहमदनगर जिल्ह्यातील बियर शॉपी 300 दर महिन्याला हप्ता 2000 रुपये त्याचे होतात 600000
अहमदनगर जिल्ह्यातील वाईन्स शॉप fl II . 38 दर महिन्याला प्रत्येक दुकानाकडून 1 0.000 = 380000
अहमदनगर जिल्ह्यातील देशी दुकान 250 दर महिन्याला 5000 रुपये त्याचे होतात 125000
अवैध दारू विकणारे डावे प्रत्येक डाव्या वाल्याकडून हजार रुपये
तीन कारखान्यांकडून दर महिन्याला पन्नास हजार रुपये
अशाप्रकारे सध्या रेट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत हे खरे की खोटे माहीत नाही मात्र निश्चितच काही टक्के तरी खरे रेट असल्याचं काही परमिटरूम धारकांनी सांगितले आहे.

अशाप्रकारे अंदाजे 6.46.0000 ( 64 लाख 60 हजार रुपयांचा ) अवैध महसूल हा कोणाचा खिशात जातो हे आता विचारायला नको मात्र या रझाकारी अवैद्य वसुलीमुळे परमिट धारक चांगलेच वैतागले आहेत यावर कुठेतरी चाप बसावा अशी मागणी परमिट रूप धारकांमध्ये होत आहे अनेक परमिट रूम धारकांनी या आकड्यांबाबत खाजगी मध्ये दुजोरा दिला आहे नाव न छापण्याच्या अटीवर अनेकांनी याबद्दलची माहिती आम्हाला पुरवली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular