Homeशहरबातमीचा परिणाम काही तासातच महावितरणच्या जीवघेण्या डिपी वर बसवले दार... तारा आणि...

बातमीचा परिणाम काही तासातच महावितरणच्या जीवघेण्या डिपी वर बसवले दार… तारा आणि मोठ्या डीपीची दुरुस्ती नागरिकांनी मानले आवाज महाराष्ट्राचा वेब पोर्टलचे आभार…

advertisement

अहमदनगर दिनांक १३ जुलै
अहमदनगर शहरातील उपनगरात असलेल्या आनंदनगर शाळेसमोरील गुलमोहर रोडवर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचा स्फोट झाल्या सारखा आवाज शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान झाला होता या आवाज झाल्यामुळे परिसरातील लोक भयभीत झाले होते. ही डीपी शाळेच्या समोरच असल्याने या डीपीच्या अवतीभवती शाळेतील मुलांचे पालक मुलांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी येत असतात तर लहान मुलेही आपल्या पालकांची वाट या डीपीच्या अवतीभवती उभे राहून पाहत असतात त्यामुळे एखाद्या दिवशी मोठी भयंकर घटना या ठिकाणी होऊ शकते यासाठी ही डीपी स्थलांतरित करावी अन्यथा सुरक्षेसाठी उपाययोजना करून उघडी डीपी बंद करावी अशी बातमी आवाज महाराष्ट्राच्या या वेब पोर्टल वरून प्रसिद्ध होताच आणि या परिसरातील सजग नागरिक एडवोकेट विक्रम वाडेकर कमल कोहली ,श्रीनिवास होमकर,नितीन दाणे डॉक्टर खन्ना ,प्रशांत दरे ,रोनक नय्यर ,प्रा संजय पाटील ,प्रशांत बोराडे ,ओमकार सुगम ,पराग मानकाळे,प्रशांत भालेराव ,आदित्य शिर्के
मंगेश पंचयारीया आदींनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले होते बातमीद्वारे पाठपुरावा आणि नागरिकांचा जोर यामुळे तातडीने महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने डीपीच्या सुरक्षेचे बाबत उपायोजना सुरू केल्या आणि डीपी ही बदलून देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते उघडे असलेली डीपी आता बंद अवस्थेत झाली असून यामुळे लहान मुलांना होणारा धोका आढळला आहे माझं तरीही डीपी करावी ही मागणी असून लवकरच जागा मिळाल्यानंतर डीपी स्थलांतरित करू असे आश्वासन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

नागरिकांचा पाठपुरावा आणि आवाज महाराष्ट्राची बातमी यामुळे डीपीचे काम मार्ग लागले यासाठी नागरिकांनी आवाज महाराष्ट्राचा या वेब पोर्टलचे आभार मानले आहेत. नवी डीपी लावून परिसरातील सर्व नागरिकांना चांगली सेवा दिली. तसेच नवीन डीपी व झाकण मुळे आता परिसरात कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही याबद्दल महवितरण कंपनीचे आभार सर्व नागरिकांनी मानले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular