अहमदनगर दि.१२ जुलै
लोकसभा निवडणूक संपली आणि आता वेध लागले आहेत विधानसभेचे वेध लागले आहेत.लोकसभेत माहाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळाले असल्याने महाविकास आघाडी मधील सर्वच घटक पक्षातील अनेक जण विधानसभेसाठी इच्छुक आहेत.तर महायुती मधील घटक पक्षातील काही जणांनी विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे त्यासाठी आता अनेक जण तयारीला लागले आहेत.सोशल मीडिया जनसंपर्क आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून तयारी सुरू झाली आहे.
तर सध्या नगर शहरात जणांनी अनोखा फंडा आणला असून काही सर्व्हे करणारे माणसे सोडून आपणच कसे शहरतून पुढे आहोत हे दाखवण्यासाठी खोटा सर्व्हे करत असल्याचं अढळून आले आहे.
काही माणसे नगर शहरात फिरत असून विधानसभेच्या निवडणुकीचा सर्व्हे करत असल्याचे सांगत आहे.सर्व्हे करणाऱ्या मोठ मोठ्या कंपन्यांची नावे घेऊन हा सर्व्हे करत असल्याचं सांगून ठराविक प्रश्न विचारले जातात मात्र नगर शहरात सध्या तरी डजनभर उमेदवार इच्छुक असताना फक्त दोनच जणांची नावे विचारली जातात आणि विकास सोडून भलतेच प्रश्न विचारले जात आहेत.जे प्रश्न सर्व्हे मध्ये विचारले जाण्याची आवश्यकता आहे ते सोडून कोणता उमेदवार चांगला आहे हेच सर्व्हे वाला सांगत सुटतो त्यामुळे तो सर्व्हे करायला आला की प्रचार करायला आला हे. समजत नाही.
एकंदर सर्व्हेवाल्याच्या प्रश्नांवरून हा डूप्लिकेट सर्व्हेवाला आहे हे लक्षात येतं मात्र हा अनोखा फंडा आता बाजारात आला असून आपला पक्ष आणि आपणच कसे शहरातून पुढे राहू यासाठी हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.कारण सर्व्हे दाखवून पक्ष श्रेष्ठी असतील किंवा पक्षातील नेते यांच्या कडून जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ही युक्ती तर नसेल ना असेही वाटू लागले आहे.