अहमदनगर दि.२० एप्रिल
राज्यातील महापालिकांचे उपायुक्त तसेच नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नत्या राज्य शासनाने केल्या असून राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन बांगर यांची नगर महापालिकेच्या उपायुक्तपदी (मुल्य निर्धारक व कर) नियुक्ती करण्यक्त अली आहे.
राज्य शासनाने काढलेल्या या बदल्यांच्या
आदेशामुळे नगरमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
नगर महापालिकेत उपायुक्त पदाच्या दोन जागा आहेत.
त्या दोन्हीही जागांवर सध्या अधिकारी कार्यरत आहेत.
त्यामध्ये डॉ. श्रीनिवास कुन्हे हे सामान्य प्रशासन तर
यशवंत डांगे हे मुल्य निर्धारत व कर उपायुक्त आहेत.
डांगे यांच्या बदलीबाबत कोणताही आदेश न काढता
उपायुक्त कर म्हणून राहुरीचे मुख्याधिकारी सचिन बांगर
यांची नियुक्ती केल्याने नगरमहापालिकेत चांगलाच संभ्रम
निर्माण झाला आहे.