Home शहर मनपाच्या कर्मचाऱ्यांचा पगार थकला बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

मनपाच्या कर्मचाऱ्यांचा पगार थकला बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

अहमदनगर दि.९ ऑगस्ट
महानगर पालिकेच्या आस्थापना विभाग व लेखा विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे महानगरपालिका कामगारांचा जुलै 2022 चा पगार मिळाला नाही त्यामुळे सोमवारी कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्या सह पदाधिकारीआणि कामगारासह आंदोलन सुरू करण्यात आले होते.

महानगरपलिकेतआंदोलन दुपारी चार वाजेपर्यंत सुरू होते. आंदोलन चालू असताना आंदोलनस्थळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे,स्थायी समिती सभापती कुमारभाऊ वाकळे,अनिल शिंदे,तसेच काही नगरसेवकांनी आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांची भेट घेतली तसेच आंदोलनस्थळी आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी भेट देऊन लवकरात लवकर मार्ग काढून कामगारांचा पगार अदा करणेबाबत आश्वासन दिले.

ऑगस्ट महिन्यांमधील सार्वजनिक सुट्ट्या पाहता कामगारांच्या पगाराचा प्रश्न अत्यंत बिकट झालेला असल्यामुळे महानगरपालिकेच्या या अन्यायकारक धोरणाविरुद्ध बुधवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे,सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी दिलीय

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version