Home शहर थकीत मालमत्ता कर भरा शस्ती मध्ये १००℅ सूट मिळवा अहमदनगर महानगर पालिकेची...

थकीत मालमत्ता कर भरा शस्ती मध्ये १००℅ सूट मिळवा अहमदनगर महानगर पालिकेची योजना

अहमदनगर दि.२५ जुलै

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी महानगरपालिकेने चांगली योजना दिली असून ज्या नागरिकांचे मालमत्ता थकबाकी आहे त्यांच्या साठी मालमत्ता करावरील २% शास्तीच्या आकारलेल्या रकमेत सवलत देण्यात आली आहे.


महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसुची ‘ड’ प्रकरण ८ कराधान नियम ५१अन्वये मनपा आयुक्तांच्या अधिकारात प्राप्त असलेल्या अधिकारानुसार मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी आदेश काढला असून. ज्या मिळकतधारकांकडे मालमत्ता कर व त्यावर आकारण्यात आलेल्या शास्तीचा भरणा थकीत आहे. अशा मिळकतधारकांना मालमत्ता करावरील २% शास्तीच्या रकमेवर २६-०७-२०२२ ते ३१-०८-२०२२ या कालावधीत थकीत कर भरणाऱ्या नागरिकांना शस्ती मध्ये सवलत मिळणार आहे.

टक्केवारी मध्ये सुमारे १००% सवलत मिळणार असून
मनपाने दिलेल्या कालावधी मधे जी २% शास्तीच्या रकमेची आकारणी झालेली आहे. त्या रकमेवर सुट देण्यात येणार आहे.ही सुट मिळण्यासाठी मिळकतधारकांनी शास्तीची होणारी सुट सोडून होणारी उर्वरीत मालमत्ता कराची सन २०२२-२०२३ अखेरची एकुण रक्कम एक रकमी भरणे बंधानकारक राहणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version