Homeविशेषखून प्रकरणी अटक असलेल्या भाजपा नगरसेवकाला शाही बडदस्त मयत अंकुश चत्तर यांच्या...

खून प्रकरणी अटक असलेल्या भाजपा नगरसेवकाला शाही बडदस्त मयत अंकुश चत्तर यांच्या कुटुंबीयांचा आरोप आरोपींना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करा अन्यथा विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा शितल चत्तर यांचा इशारा

advertisement

अहमदनगर दि.२२ जुलै

अहमदनगर शहरातील एकविरा चौक येथे 15 जुलै रोजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेनंतर याप्रकरणी पोलिस तपासात आरोपी म्हणून भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील शिंदे याच्याबरोबर आणखीन सात ते आठ आरोपी असून या सर्वांनी मिळून अंकुश चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून क्रूरपणे हत्या केली होती. काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी विधानसभेत आवाज उठवला होता तर याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या खून प्रकरणातील सर्व आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून या पोलिस कस्टडीमध्ये त्यांची शाही बडदास्त ठेवण्यात येत असल्याचा आरोप मयत अंकुश चत्तर याच्या कुटुंबीयांनी केला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या लॉकऑप मध्ये या आरोपींना ठेवण्यात येते त्या ठिकाणी नवीन फॅन लावण्यात आले असून त्या ठिकाणी आरोपींना दिला जाणारा भत्ता न खाता तपासाच्या नावाखाली पोलीस स्टेशनच्या बाहेर आरोपींना काढून हॉटेलचे जेवण दिले जात असल्याचा आरोप अंकुश चत्तर याच्या पत्नीने केला आहे. या आरोपींना कठोर शासन होणे गरजेचे असताना आरोपींची शाही बडतस्त ठेवली जात असून या सर्व प्रकाराला जबाबदार असणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सानप आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये खुणाचा गुन्हा दाखल झाला आहे त्या पोलीस स्टेशनचे पीएसआय समाधान सोळंके यांचे तात्काळ निलंबन करावे अन्यथा मुंबई येथे विधान भवना समोर सहकुटुंब आमरण उपोषणास बसण्याचा इशारा अंकुश चत्तर याच्या आई मामा आणि पत्नीने दिला आहे.

विशेष म्हणजे आरोपींसाठी चार दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फॅन लावत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून आरोपींना ही शाही वागणूक का दिली जाते यामागे काही इतर कारणे आहेत का आणि अचानकपणे पोलीस स्टेशनमध्ये हे आरोपी आल्यानंतरच फॅन कसे लागले गेले असे काही प्रश्न आता समोर येऊ लागला आहेत. तसेच ज्या लोकांनी ज्या कारागिरांनी फॅन फिट केले त्या लोकांची चौकशी केली असता अजूनही काही गोष्टी बाहेर येऊ शकतात त्यामुळे हा सर्व एकंदर प्रकार संशयास्पद आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular