अहमदनगर दि.२२ जुलै
अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोड येथील एकविरा चौक येथे सामाजिक कार्य करणारे अंकुश चत्तर या युवकाचा अतिशय निर्घृपण काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हत्या केली होती. त्यानंतर त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस प्रशासनातर्फे अटक करण्यात आली आहे. सदर अटक आरोपींवरती या आधी ही खुन, दरोडे, लुटमार, फसवणूक, खंडणी जबरीमारामारी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस प्रशासनातर्फेच खुलासा करण्यात आलेला आहे.दिनांक 17 जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास कै.अंकुश चत्तर यांची अंतयात्रा ही त्यांचे राहते घरापासून पाईपलाईन रोड मार्गे प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौका मार्गे दिल्लीगेट व नालेगाव अमरधाम अशी काढण्यात आली होती. सदर अंतयात्रे दरम्यान योग्य तो पोलीस बंदोबस्त पोलीस प्रशासनातर्फे सकाळपासूनच नेमण्यात आला होता. त्यावेळी सदर अंतयात्रेमध्ये युवक,वृध्द, महिला व लहान मुले असे सर्व मिळून जवळ जवळ 8 ते 10 हजारांहून अधिक लोक आदरांजली वाहण्याकरिता स्वइच्छेने सामील झाले होते. सदर अंतयात्रे दरम्यान सर्व दुकाने हे दुकान मालक यांनी स्वतःहून बंद ठेवून एक प्रकारची आदरांजली वाहीली होती.
सदर अंतयात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. तरी आज आम्ही काळे नामक व्यक्तीची एक व्हिडीओ क्लीप पाहिली व ऐकली असून त्यामध्ये ते असे म्हणतात की, सदरचे दुकाने हे गुंडगीरी करुन व धमकी देऊन बंद ठेवण्यात आले होते. त्याबाबत
त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नसताना त्यांनी मयताची बदनामी होईल व मयत हा गुंडगीरी करणारा आहे. असे भासविण्याकरिता सदरचे वक्तव्य केलेले आहे. सदर अंतयात्रेच्या मार्गावरील दुकानदारांनी याबाबत कुठलेही तक्रार पोलीस प्रशासनाकडे केलेली नसून त्याबाबत पोलीस प्रशासनाकडे ही कुठलीही माहितीची नोंद नाही. तसेच सदर मार्गावर सी.सी.टी.व्ही. फुटेज असून सदरच्या फुटेजमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचेच दिसून येत आहे. त्यानंतर काळे यांनी सदर मयताची तुलना कुख्यात गुंड गज्या मारणे याच्याशी केली आहे. परंतु मयत अंकुश चत्तर हा सामाजिक कार्यकर्ता असून त्यावर असे कोणतेही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल नसून काळे यांनी मयत अंकुश चत्तर यांना समाजातून मिळत असलेल्या भावनिक साथीला कुठेतरी चुकीचे वळण देऊन यातील आरोपी हे कसे चांगले आहेत व त्यांनी एका गज्या मारणेसारख्या गुंन्हेगाराचा खातमा केला, असे भासविण्याचे प्रयत्न केले आहेत. काळे यांनी यातून आरोपींना जाणिवपूर्वक नागरिकांची सहानुभूती मिळावीव आरोपींना या गुन्ह्यात फायदा मिळावा अशा विचारानेच हे वक्तव्य केले आहे. त्यानंतर काळे यांनी सदर गुन्ह्यामध्ये आम्ही नातेवाईकांनी केलेली मागणी ही की, सदर गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कामकाज पाहण्याकरिता विशेष सरकारी वकील श्उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, यालाही ते विरोध करत असून त्यांनी त्या व्हडीओमध्ये आमच्या मागणीचा सरळ सरळ विरोध केला असून एक प्रकारे यातील आरोपींना शिक्षेपासून वंचित कसे ठेवता येईल, याचाच विचार करुन सदरचे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी सदर आरोपींना मोक्का कसा लागत नाही, हे जाणीवपूर्वक खोट्या अशायाच्या माहितीवर वक्तव्य केले असून सदर आरोपींना या गुन्ह्या मोक्का लागणार नाही व हे आरोपी लवकरात लवकर बाहेर येतील अशी एक भितीदायक भावना सदर गुन्ह्याती साक्षिदार व फिर्यादी यांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता मोक्का अंतर्गत होणाऱ्या कारवाईबाबत काळे यांनी सदर व्हिडीओत चुकीचे वक्तव्य केलेले आहे.
तसेच काळे यांनी मय कै. अंकुश चत्तर यांच्यावर या आधी 16 गुन्हे दाखल आहेत, असे खोटे व चुकीचे वक्तव्य केलेले असून मयत कै. अंकुश चत्तर यांच्यावर जे जुने गुन्हे दाखल झाले होते ते राजकीय आकसापोटी दाखल करण्यात आले होते. ते गुन्हेही न्यायालयीन प्रक्रियेतून निर्दोष मुक्त करण्यात आले होते. तरी ही काळे यांनी मयत कै.अंकुश चत्तर यांच्याबाबत 16 गुन्हे दाखल आहे, असे चुकीचे वक्तव्य करुन मयत कै.अंकुश चत्तर यांची प्रतिमा गुंड आहे अशी भासविण्याचा प्रयत्न केला आहे.काळे व यातील आरोपी स्वप्निल शिंदे व त्यांचे बंधु सचिन शिंदे यांच्याशी काळे यांची खुप जवळीक असून त्यांचे जमिनीबाबत आर्थिक व्यवहार होत होते, असे आम्हाला समजले आहे.
काळे यांनीसदरचा व्हिडीओ हा फक्त मयत अंकुश चत्तर व त्याला मिळत असलेल्या सहानुभूतीच्या विरोधात जाऊन मयत अंकुश चत्तर यांची सामाजिक प्रतिमा मलीन करण्याकरिता व आरोपी व त्यांचे साथिदार यांना या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता कशी होईल या सगळ्यांचा विचार करुन केलेला आहे व तो त्यांनी प्रसार माध्यमांमध्ये देऊन मयत अंकुश चत्तर यांची एक प्रकारे बदनामी केलेली आहे.काळे यांचे बंधु हे वकिली करतात व सदरची केस ही आरोपींच्या वतीने ते भविष्यात न्यायालयात चालवणार असून त्यांना उज्वल निकम यांची खात्री आहे की, निकम हे सदर गुन्ह्यात आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावतील. यामुळे ते उज्वल निकम यांच्या नेमणुकीला विरोध दर्शवत असून एक प्रकारे आरोपींना कसा फायदा होईल याचाच विचार करत आहेत.काळे यांनी मयताची बदनामी करुन मयताची प्रतिमा मलिन करुन मयत हा गुंड आहे, असे भासवून मयता बरोबरच्या लोकांवर साक्षिदारांवर व फिर्यादीवर सदरचे चिथावणीखोर वक्तव्य करुन भितीचे वातावरण निर्माण केले आहे. तसे पाहता काळे त्यांनी आमच्या परिवाराच्या भावना दुखवल्या आहेत. व आरोपींना या गुन्ह्यात मदत होईल व साक्षिदार हे भयभित होतील असे वातावरण तयार केले आहे. त्यामुळे काळे यांची सखोल चौकशी होऊन त्यांनाही आरोपींना मदत करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे व साक्षिदार फिर्यादी व मयताचे घरचे यांच्यावर भितीचे वातावरण तयार करणे, या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात यावा. काळे यांच्यावर ही तोफखाना पोलीस स्टेशन, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, भिंगार पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल असून त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात चत्तर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे.