HomeUncategorizedखून प्रकरणी जेलमध्ये असलेल्या आरोपीला भेटण्यासाठी बनावट आधार कार्ड आणि भाऊ नसताना...

खून प्रकरणी जेलमध्ये असलेल्या आरोपीला भेटण्यासाठी बनावट आधार कार्ड आणि भाऊ नसताना भेटायला जाणाऱ्या तरुणावर कारवाई करा.. भागानगरे कुटुंबीयांची मागणी

advertisement

अहमदनगर दिनांक २७ ऑक्टोबर
नगर शहरातील माळीवाडा परिसरातील तरुण गामा उर्फ ओमकार पांडुरंग भागानगरे याची वीस जून रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी ओळखून आणि भागानगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश केरप्पा हुच्चे, नंदू बोराटे, संदीप गुडा आणि इतर आरोपींना याप्रकरणी अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून या सर्व आरोपींचा मुक्काम हा अहमदनगर मधील सबजेलमध्ये आहे.

नगर शहरातील सबजेल मधील कैदी भेट घेण्यासाठी बुधवार हा वार ठरवून देण्यात आलेला आहे मात्र कैदी असलेल्या इसमच्या जवळचे नातेवाईकच भेटू शकतात.

याच सबजेल मध्ये ओमकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपी असलेला गणेश हुच्चे याला भेटण्यासाठी एक तरुण जात असून तो त्याचा नातेवाईक नसतानाही तो जेल मध्ये प्रवेश करून भेटण्यासाठी जात असल्याचा पुरावा ओमकार भागानगरे याचे वडील पांडुरंग भागानगरे यांनी मिळवला असून गणेश हुच्चे याला भेटायला जाणारा अमोल येवले हा तरुण गणेश हूच्चे याच्याकडे कामाला आहे. विशेष म्हणजे अमोल येवले याचे अमोल केरबा हूच्चे या नावाने आधार कार्ड बनवून त्याने भाऊ म्हणून जेलमध्ये प्रवेश करून आरोपीची भेट घेतल्याचेही पुरावे भागानगरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर केले आहेत.

तुरुंग अधिकारी श्रीमती सुवर्णा शिंदे यांना या फसवेगिरीबद्दल पांडुरंग भागानगरे यांनी माहिती दिल्यानंतर सुवर्णा शिंदे यांनी उलट भागानगरे यांनाच तुम्ही अशा गोष्टींच्या फांद्यात का पडता असा सल्ला दिला तसेच आम्ही पाहू कुणाला भेटू द्यायचे ते आणि अमोल येवले हा माझ्या सांगणेवरूनच गणेश याला भेटायला येतो तुम्ही या भानगडीत पडू नका. असे म्हणून मलाच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली . तसेच माझ्या समोरच श्रीमती सुवर्णा शिंदे यांनी फोन लावला आणि समोरील इसमास सांगितले की अमोल येवले हा गणेशला भेटतो हे समोरच्यांना कळाले आहे. त्यामुळे त्याला काही दिवस इकडे पाठवू नका त्याचा डबा दुसऱ्या मार्फत पाठवा मी तो त्याला पोहोच करण्याची व्यवस्था करते. त्यानंतर मला उगाच कशाला आमच्या पोटावर पाय देता शांत बसा नाहीतर निट करीन अशी धमकी दिली आशा आशयाची तक्रार ओमकार भागानगरे यांचे वडील पांडुरंग तुकाराम भागानगरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेला तक्रार अर्जात केली आहे.

याबाबत जेलमध्ये असलेल्या सर्व कागदपत्रांवर अमोल हूच्चे यांनी आरोपीची भेट घेतल्याची नोंदी असून तो जेलमध्ये अमोल हूच्चे याच नावाने प्रवेश करत असल्याचाही निदर्शनास आले आहे त्यामुळे आता या अमोल येवले सह अमोल येवले प्रवेश करण्यासाठी सहाय्य करणारे केरप्पा हुच्चे तुरुंग अधिकारी श्रीमती सुवर्णा शिंदे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

अमोल येवले याचे बोगस आधार कार्ड या तक्रार अर्जात जोडण्यात आले असून सब जेलमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही व्हिडिओ ताब्यात घेतल्यास सर्व गोष्टी समोर येतील अशी ही मागणी या अर्जात करण्यात आली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular