Homeशहरनगर अर्बन बँकेतील "ते" लॉकर्स उघडण्याचा बँक प्रशासनाचा निर्णय

नगर अर्बन बँकेतील “ते” लॉकर्स उघडण्याचा बँक प्रशासनाचा निर्णय

advertisement

नगर दिनांक १ जानेवारी : नगर अर्बन बँकेच्या विविध शाखांमधील लॉकर्स बाबत वारंवार जाहीर निवेदने दिल्यानंतरही तसेच संबंधित लॉकर्सधारकांना नोटीसा पाठवून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही भाडे भरण्यासाठी संबंधित लॉकरधारक अथवा त्यांचे कायदेशीर वारस हे पुढे न आल्याने अखेर ते 132 लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष उघडण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.

अनेक वर्षांपासून बंद असलेल्या विविध शाखांमधील लॉकर्स बाबत बँक प्रशासनाने संबंधितांना उपलब्ध असलेल्या पत्त्यांवर नोटीसा पाठवून तसेच उपलब्ध असलेल्या मोबाईल – दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र 132 लॉकरधारकांनी अद्याप बँक प्रशासनाकडे संपर्क साधलेला नाही. लॉकर भाड्यापोटी मोठी रक्कम संबंधितांकडून बँकेला येणे आहे. त्यामुळे असे लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष उघडून त्यातील चीज वस्तू / मुद्देमाल सीलबंद करून मुख्य शाखेतील लॉकरमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तसेच थकीत लॉकरचे भाडे संबंधित लॉकरधारक अथवा त्यांचे वारस यांचेकडून किंवा मुद्देमालाचा लिलाव करून वसूल करण्यात येणार आहे.
या लॉकरधारकांची यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.nucb.in वर प्रकाशित करण्यात आलेली असून लॉकरधारकांनी तात्काळ संबंधित शाखेची अथवा बँक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular