नाशिक दिनांक 31 डिसेंबर
लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्रात 2024 या साली 151 लास्कोरांना लाच घेताना पकडण्यात आले असून २१९ लास्कोरांवर विविध कलमांद्वारे कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ५२, अहमदनगर जिल्ह्यात ३०, धुके जिल्ह्यात २०, नंदुरबार जिल्ह्यात १२ व जळगाव जिल्ह्यात ३७ सापळा कारवाई करण्यात आलेल्या असुन भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्यये विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या संपूर्ण कारवाईत २१९ आलोसेंमध्ये नाशिक परिक्षेत्रात वर्ग १ चे १७, वर्ग २ चे २०, वर्ग ३ चे ११२,
वर्ग ४ चे १४, इतर लोकसेवक २० व खाजगी इसम ३६ यांचा समावेश आहे.
सन २०२४ मध्ये नाशिक परिक्षेत्रात विविध विभांगावर कारवाई करण्यात आलेली असुन वर्षभरात पोलीस
विभागात ३०, महसुल विभागात २४ कारवाई, जिल्हा परिषद १६ कारवाई, म.रा.वि.वि कपंनी मय विभागात
११, पंचायत समिती १०, शिक्षण विभागात ९, व भुमी अभिलेख ५ अशा विविध विभागांत कारवाई केली असुन सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे नाशिक गटा काने कारवाई केलेल्या पुरातत्व विभागातील संचालक तेजस गर्गे व तंत्र सहायक आरती आले यांचेवर १५००००/- रू लाच स्विकाल्याची कारवाई, तसेच नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे वैदयकीय अधिकारी डॉ. आबिद आबु अत्तार व डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार यांना ३००००/- रू लाच स्विकारतांना पकडण्यात आले. आणि येवला येथील गटविकास अधिकारी
मच्छिंद्रनाथ देवव्रत धस यांचेवर २००००/- रू लाचेची रक्कम स्विकारतांना कारवाई करण्यात आली. पिंपळगाव येथील मराविवि कं मर्या चे उप कार्यकारी अभियंता यांना १०००००/- रू ची लाच स्विकारतांना पकडण्यात आले. नवापुर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना ५००००/- रू लाच स्विकारतांना पकडण्यात आले. तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांना ५००००/- रू स्विकारतांना पकडण्यात येवुन
त्यांचेवर कारवाई करण्यात आली, तसेच अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय दत्तात्रय लोंढे व सोबत सहायक लेखाधिकारी रविंद्र सुकदेव लाडे यांना २६०००/- स्विकारतांना पकडण्यात येवुन त्यांचेवर कारवाई करण्यात आली. नगर घटकातील पाटबंधारे संशोधन विभागातील सहायक अभियंता रूबीया शेख व नाशिक येथील
कार्यकारी अभियंता रजनी पाटील यांचेवर ६२०००/- रू लाच स्विकारल्याने कारवाई करण्यात आली. धुळे घटकात दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना १५००००/- रू लाचेची मागणी करून पोलीस कर्मचाऱ्याने लाच घेतांना पकडण्यात आले होते. जळगाव विभागात गणेश सुरळकर, विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षक उद्योग उर्जा कामगार व खनिकर्म विभाग यांचेवर १५०००/- रू लाच स्विकारल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली.
तसेस भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. जळगांव चे अवसायक तथा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगांव येथील चैतन्य नासरे यांना १५००००/- रू ची लाच स्विकारल्याने कारवाई करण्यात आली.
तसेच सन २०२४ मध्ये एकूण ३८४८४५०/- रू लाच स्विकारण्याचे सापळा कारवाई करण्यात आली
आहे. उघड चौकशी करून नाशिक घटकात अनिल चुडामण महाजन, सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी, महानगर पालिका, नाशिक यांचेवर उघड चौकशी अंती कायदेशीर उत्पन्ना पेक्षा १,३१,४२,८६९/- रुपयांची अपसंपदा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेवर अपसंपदेचा गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली. तसेच सुभाष मारुती कदम, तत्कालीन प्रभारी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपुर जि. नाशिक यांनी १९,५०,६८२/- रूपये
रूपयाचे स्वताच्या फायदयासाठी शासनाच्या निधीचा दुरूपयोग करून शासनाची फसवणूक बनावटीकरण करून शासकीय निधीचा गैरवापर व अपहार केला म्हणन अन्यभ्रष्टाचाराचा गुन्हा नोंद केला असुन मालेगाव महानगरपालीका मधील अधिकारी व कर्मचारी यांनी मालेगांव महानगर पालिकेच्या निधीतील रक्कम रु. २०,६८,६०७/- रू थे आर्थिक नुकसान ( अपहार केल्याचे उघड चौकशीअंती निष्पन्न झाल्याने मालेगाव महानगरपालीकेतील १५ अधिकारी
व कर्मचारी यांचे कर अन्यभ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
२०२४ मध्ये कारवाईत नाशिक परिक्षेत्र १५१ सापळा कारवाई करून महाराष्ट्रातील एकूण सापळा
कारवाईत पहिल्या स्थानी आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक तर्फे नागरीकांना आवाहन करण्यांत येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्रातील कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.