अहमदनगर दि.६ मे
नगर अर्बन बँकेच्या घोटाळेबाज संचालकांच्या अडचणीत वाढ झाली असून संभाजीनगर उच्च न्यालयात नगर अर्बन बँकेचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र आगरवाल यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात नगर अर्बन बँकेच्या विरोधात दाखल झालेली फिर्याद रद्द करावी आणि एम पी आय डी कायदा रद्द करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
या याचिकेवर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि अखेर न्यालयायाने ठेवीदारांच्या बाजूने निकाल दिला असून राजेंद्र गांधी यांची फिर्याद रद्द न करण्याचा आणि एम पी आय डी लागू राहणार असा निकाल न्यायालयाने दिला असल्यामुळे ठेवीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालामुळे घोटाळेबाज संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी अनेक वर्षांपासून पासून बँक डबघाईस जात आहे हे वेळोवेळी दर्शनास आणून दिले होते मात्र तरीही घोटाळे बाज संचालकांनी त्याकडे लक्ष दिले नाही अखेर रिझर्व बँकेने बँकेचा परवानाच रद्द केला त्यामुळे अनेक ठेवीदारांचे बँकेमध्ये ठेवी अडकल्या असून या ठेवी परत मिळवून देण्यासाठी आता ठेवीदारांची लढाई सुरू आहे या लढाईस मोठे यश आले असून न्यायालयाने घोटाळेबाज संचालकांना चांगलीच चपराक दिली आहे.