Homeक्राईमतुझे नखरे बंद कर नाही तर हात पाय तोडून देण्याची एम आय...

तुझे नखरे बंद कर नाही तर हात पाय तोडून देण्याची एम आय एम जिल्हाअध्यक्षांची कार्याध्यक्षांना धमकी..

advertisement

अहमदनगर दिनांक ६ मे
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एम. आय. एम पक्षाचे वतीने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून एमआयएम पक्ष चांगला चर्चेत आला आहे. त्यानंतर शेवटच्या दिवशी अचानकपणे एम आय एमच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली या माघारी घेतल्यानंतर उमेदवार परवेज शेख यांच्यावर पक्षांतर्गत चांगलेच आरोप झाले. आता या पक्षांतर आरोपांचा वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला असून एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष परवेज शेख यांच्या विरोधात मतिन नाजमोहमद शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

परवेज शेख यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते या आरोपांचा राग मनात धरून परवेज शेख यांनी मतीन शेख यांना धमकी दिली असून मुझे नखरे बंद कर नाही तर
तुझे हात पाय तोडुन टाकीन असा दम दिला अशी फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे एम आय एम पक्षातील अंतर्गत कलह हा चांगलाच पेटला असून आता हा कलह थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular