Homeक्राईमनगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी दाेन संचालकांना २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी दाेन संचालकांना २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

advertisement

अहमदनगर दि.२७ जानेवारी :
नगर अर्बन (Nagar Urban Bank) घाेटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (ECONOMIC OFFENCE WING) नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक तथा नगर महापालिकेचे माजी नगरसेवक मनेष साठे व अनिल काेठारी यांंना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते .त्या दोघांनाही पुढील तपासासाठी 2 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपींच्या वतीने अहमदनगर मधील एडवोकेट महेश तवले, एडवोकेट जामदार, एडवोकेट संजय वालेकर, एडवोकेट संकेत ठाणगे हे काम पाहत आहेत.

बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे. बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट झालेले आहे. या संदर्भातील अहवाल मागील महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. यात हा घोटाळ्याचा आकडा २९१ कोटीच्या वर गेल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया व प्रदीप जगन्नाथ पाटील या दोघांना अटक केली होती. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. एसआयटीने नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी पहिल्यांदाच तत्कालीन संचालकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

दोन माजी संचालकांना अटक झाल्यामुळे आता इतर संचालक परार झाले असल्याची माहिती समोर येत आहे. अनेकांचे फोन स्विच ऑफ झाले असून अटकेच्या भीतीने अनेक जण नगर शहर सोडून बाहेर गावी गेल्याची चर्चा सध्या बाजारपेठेमध्ये सुरू आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular