HomeUncategorizedदिंडोरी प्रणीत समर्थ सेवा मार्गाचा जागतिक कृषी महोत्सवात नगरच्या स्वाती जाधव...

दिंडोरी प्रणीत समर्थ सेवा मार्गाचा जागतिक कृषी महोत्सवात नगरच्या स्वाती जाधव यांचा सन्मान

advertisement

नाशिक दि.२८ जानेवारी
नाशिक येथील दिंडोरी येथे २४ ते २८ जानेवारी दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.दुग्धव्यवसाय व स्वयंरोजगार अंतर्गत रोजगाराची संधी. सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची नाव नोंदणी करून मार्गदर्शन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिला सक्षमीकरण अंतर्गत हस्तकला, पाककला, गृहउद्योग या संदर्भात मार्गदर्शन, शेतकरी बांधवांसाठी सेवामार्गाच्या सात्त्विक कृषीधन निर्मिती अंतर्गत सात्त्विक शेतमालाची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांना कर्तृत्ववान,
स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन तसेच दुर्ग संवर्धन अभियान अंतर्गत ५०० हून अधिक प्राचीन शस्त्र – अस्त्र प्रदर्शनसह मोडी लिपी व शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके व शेतकरी वधू- वर परिचय मेळावा आदी भरगच्च कार्यक्रम असलेला दिंडोरी प्रणीत श्री. स्वामी समर्थ सेवा मार्गच्या वतीने २४ जानेवारीपासून पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (Dindori Praneet Samarth Seva Marga World Agriculture Festival)

24 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे 26 जानेवारी रोजी
पर्यावरण व दुर्ग संवर्धन व स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या यावेळी महाराष्ट्रातील प्रेरणादायी महिलांचा सन्मान पंकजाताई मुंडे आणि
कृषी महोत्सव आयोजक आबासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. नगरच्या सृष्टी कॉम्प्युटरच्या संचालिका
स्वाती राजेंद्र जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला स्वाती जाधव या सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून मागील 15 वर्षा पासून समाजसेवेत कार्यरत आहेत.महिलांना व्यवसायाचे प्रशिक्षण देणे, त्यांच्या मनगटात आत्मनिर्भरतेचे बळ आणणे, त्यांना व्यवसाय व नोकरीत मिळवून त्यांना स्वावलंबी बनवणे. या कार्यासह महिलांसाठी अनेक उपक्रम सृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत आहेत , स्वसंरक्षणाचे शिबिर ही घेतली जातात,

सृष्टी कॉम्प्युटर तर्फे गोरगरीब व गरजवंत महिलांना विनामूल्य संगणक प्रशिक्षण देऊन त्यांच्या उपजीविकेची सोय करून दिली जाते. तसेच दरवर्षी ही संस्था दहा मुले शिक्षणासाठी दत्तक घेते या सर्व कार्याचा सन्मान म्हणून स्वाती जाधव यांचा सन्मान या कृषी महोत्सवात करण्यात आला. स्वाती जाधव यांच्या माऊली अभ्यासिकेतन दरवर्षी शेकडे मुली आत्मनिर्भर होत आहेत.

या कृषी महोत्सवात संशोधक, शेतकरी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कृषीमाऊली सन्मान देण्यात आला
(National Youth Festival)

या कृषी महोत्सवात राज्यातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि कलाकारांनी उपस्थिती लावली होती कृषी महोत्सवात कृषी आणि अध्यात्मिक विषयावर विचारमंथन झाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular