अहमदनगर दि.११ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील अत्यंत जुनी असलेली बँक नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक वर अखेर अवसायकाची नियुक्ती झाली असून पुणे येथील एनसीडीसी विभागीय कार्यालयाचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नगर अर्बन बँकेचे अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एक
वर्षासाठी असणार आहे.
नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट बँकेचा बँकिंग परवाना ४ ऑक्टोबर २०१३ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला होता. त्यानंतर आता केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयाने अर्बन बँकेवरअवसायकाची नियुक्ती केली आहे. केंद्रीय निबंधक विजयकुमार यांनी
याबाबतचा आदेश ८ नोव्हेंबर २०२३ रोजी नगर अर्बन बँकेला जारी केला आहे. आता अवसायकांकडून बोगस कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी प्राधान्याने
प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय आर्थिक गुन्हे शाखेला लवकरच फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन संचालकांवर कायदेशीर कारवाई सुरू होणार आहे.