अहमदनगर दि.१० जानेवारी
नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण आता वेगाने पुढे सरकू लागले असून या कर्ज घोटाळा प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना ताब्यात घेण्याचे सत्र आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केले असून.या कर्ज घोटाळा प्रकरणातील दोन जणांना ताब्यात घेतल्याची खात्रीशीर माहिती आहे. बँकेतील वरिष्ठ अधिकारी असलेल्या दोन जणांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दोन अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे संचालक मंडळामध्ये चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.
विशेष मध्ये जे कर्मचारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्या कर्मचाऱ्यांचे फिर्यादी मध्ये नाव नाही मात्र त्यांच्याकडून काही व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्यामुळे पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे अशी माहिती मिळतेय मात्र या गुन्ह्यातील जे दोषी संचालक आहेत त्या संचालकांच्या गळ्यापर्यंत अजूनही पोलिसांचा हात गेलेला नाही ज्या लोकांनी या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार केला त्या लोकांना अटक करून त्यांच्याकडून पैसे वसूल करावेत अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे.