HomeUncategorizedमहाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या प्रकरणाचा निकाल अखेर लागला ठाकरे गटाचे आमदार झाले...

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या प्रकरणाचा निकाल अखेर लागला ठाकरे गटाचे आमदार झाले पात्र..

advertisement

मुंबई दि.१० जानेवारी
महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवणाऱ्या आणि खळबळ उडवणाऱ्या प्रकरणाचा निकाल अखेर लागला असून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र ठरणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून होती आता प्रकरणाचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला असून या निकलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र करता येणार नाही असा निकाल त्यांनी दिला आहे. शिंदे गटाचे सोळा आमदार पात्र ठरलेले आहेत.तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे 14 आमदार पात्र झाले आहेत.

शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षाच्या दोन्ही गटांनी म्हणजेच शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या गेल्या होत्या.या पक्ष फुटीच्या प्रकरणात आतापर्यंत दोन लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्र दाखल करण्यात आली होती. आमदार आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी, शिंदे गटाचे आमदार दिलिप लांडे, आमदार योगेश कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी घेण्यात आली होती.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल आज लागला आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या या निकालामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडली. या प्रकरणात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. प्रत्येक याचिकेची स्वतंत्र सुनावणी झाल्यास विलंब होईल म्हणून याची विभागणी सहा गटात करण्यात आली होती. यामुळे याचिकांच्या या सहा गटांचे सहा स्वतंत्र निकाल वाचून दाखवले गेले.या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे याचिकाकर्ते आणि वकिल उपस्थित होते.

पात्र झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार
१) अजय चौधरी२) रवींद्र वायकर३) राजन साळवी४) वैभव नाईक५) नितीन देशमुख६) सुनिल राऊत७) सुनिल प्रभू८) भास्कर जाधव९) रमेश कोरगावंकर१०) प्रकाश फातर्फेकर ११) कैलास पाटिल१२) संजय पोतनीस१३) उदयसिंह राजपूत१४) राहुल पाटील

अपात्र न ठरलेले शिंदे गटातील शिवसेना गटातील आमदार
१) एकनाथ शिंदे २) चिमणराव पाटील३) अब्दुल सत्तार४) तानाजी सावंत५) यामिनी जाधव ६) संदीपान भुमरे७) भरत गोगावले८) संजय शिरसाठ ९) लता सोनवणे १०) प्रकाश सुर्वे११) बालाजी किणीकर१२) बालाजी कल्याणकर१३) अनिल बाबर१४) संजय रायमूळकर१५) रमेश बोरनारे१६) महेश शिंदे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular