Home शहर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाने नगर...

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाने नगर मध्ये येत केली सट्टेबाजी करणाऱ्या मुख्य बुकीवर कारवाई मात्र नगर पोलिसांना बुकी माहीतच नव्हता का?

अहमदनगर दि.१९ एप्रिल
अहमदनगर शहरात आयपीएल सट्टा जोरात सुरू असल्याचं सदर आवाज महाराष्ट्राने लावले होते आयपीएल सट्टा कशाप्रकारे खेळला जातो तसेच पर्वताच्या खाली कोण कोण सावलीत उभे राहते तसेच या मध्ये कोण कोण कसे भागीदार आहेत याबद्दल सविस्तरपणे आवाज महाराष्ट्राने बातमी प्रसिद्ध केली होती.

मात्र अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील आणि अहमदनगर शहरातील पोलिसांना नगरमध्ये मुख्य बुकी कोण आहेत हे माहितीच नव्हते.मात्र नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाने अहमदनगर शहरात येत आयपीएल सट्टेबाजांवर कारवाई केली हे विशेष म्हणावे लागेल नगर शहरातील पोलिसांना जे बुकी सापडत नव्हते ते नाशिक येथून आलेल्या पथकाला बरोबर मिळून आले हे एक आश्चर्य म्हणावे लागेल.

सट्टेबाजीमुळे यामध्ये तरुण पिढी काशी बरबाद होत असून या सट्टेबाजीच्या माध्यमातून अवैद्य सावकारी ही जोरात सुरू असल्याची सविस्तर माहिती आम्ही आयपीएल सट्टा या सदराखाली दिली होती. मात्र शहरात दोन जुजबी कारवाई करत शहर पोलिसांनी सट्टेबाजी वर कारवाई करण्याचा देखावा केला होता.

शनिवारी रात्री नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री अहमदनगर शहरात येत आयपीएल सट्टेबाजांवर कारवाई केली असून कोतवाली पोलीस ठाण्यात अभिषेक विठ्ठलराव देशमुख (वय 22 मुळ रा. कोरडगाव ता. पाथर्डी, सध्या रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर), राहुल गवळी (रा. केडगाव) व स्वप्नील रामचंद्र परवते (रा. सारसनगर, अहमदनगर) यांच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थेट नाशिकवरून नगरमध्ये येत महा निरीक्षकांच्या पथकाने आयपीएल सट्टाबाजी करणाऱ्या मुख्य बुकिंग वर कारवाई केली मात्र नगर शहरातील पोलिसांना माहीत नव्हते का हा एक मोठा प्रश्न आता निर्माण होतोय.

बुरूडगाव रोडवरील चाणक्य चौकात पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी एकाला ताब्यात घेत अटक करण्यात आली तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपी अभिषेक देशमुखकडून 15 हजार 200 रूपयांची रोख रक्कम, एक दुचाकी, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोबाईलवर मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे सट्टेबाजांना आयडी व पासवर्ड दिला जात होता. सट्टेबाजांना त्यांच्या फोनवर अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जात होते. त्या अ‍ॅपवर आयडी व पासवर्डचा वापर करून आयपीएलवर सट्टेबाजी सुरू होती. त्यासाठी आरोपींनी सट्टेबाजांकडून फोन पे अ‍ॅपवर पैसे घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

नाशिकच्या पथकाने लावला माहिती तंत्रज्ञान कलम मात्र शहर पोलिसांना हे कलम माहीत नाही का?

नाशिक पोलिसांनी आयपील सट्टा चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल करताना महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड) प्रमाणे कलमे लावली आहे. मात्र शहरातील कोतवाली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आयपीएल सट्टा धारकांना पकडल्यानंतर फक्त महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) कलम लावले आहे. यामुळे स्थानिक पोलिसांची कारवाईवर प्रश्नचिन्ह उभा राहतेय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version