अहमदनगर दि१९ एप्रिल
अहमदनगर शहरात काही प्रमाणात सुरू असलेल्या गुंडागर्दी विरुद्ध म्हणजेच ताबा मारणाऱ्या गुंडा विरुद्ध ताबा हे सदर आवाज महाराष्ट्राने सुरू केले होते नगर शहरात कशाप्रकारे सामान्य नागरिकांच्या छोट्या छोट्या प्लॉटवर काही गुंड कशा प्रकारे ताबा मारतात तसेच बंगले, घर मोठमोठे प्लॉट यांच्यावरही ताबा मारून सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या बांधकाम व्यवसायिकांकडून कशाप्रकारे खंडणी वसूल केली जाते याबाबत सविस्तर सदर लावले होते. काही प्रमाणात नागरिक आता या गुंडांच्या विरोधात पुढे येत असून काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.
आज पर्यंतच्या सत्रांमध्ये ताबा प्रकरणात फक्त पुरुष गुंडांचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं मात्र आता ताबा प्रकरणात ती ही मागे नाही.
सावेडी उपनगरातील हनुमानाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका भागात एका बांधकाम व्यवसायिकाने सदनिकांचे काम सुरू केले असून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे मात्र एका ती ने थेट व्यायासायिकेला भ्रमणध्वनी करून थेट सल्ला दिला जर सल्ला ऐकला नाही तर ताबा पक्का होईल असं समजवून सांगितलं त्या मुळे तो व्यावसायिक पुरता घाबरून गेला आहे. कारण थेट फोनवरून ती चा सल्ला भेटल्याने आता काय करावे असा त्याच्या समोर प्रश्न उभा राहिला आहे.
आज पर्यंत ताबा मारण्यात तो प्रसिद्ध होता मात्र आता ताब्यात ती ची एन्ट्री झाल्याने एक प्रकारे हा धक्कादायक प्रकार आहे.
वाचत राहा …ले आउट मधील ओपन स्पेसवर ताबा पुढील भागात