Home शहर Navratri Festival 2024 : गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी पर्वणी… 11 ऑक्टोबर रोजी गरबा...

Navratri Festival 2024 : गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी पर्वणी… 11 ऑक्टोबर रोजी गरबा नाईटचे आयोजन प्रमुख आकर्षण चित्रपट अभिनेत्री प्रार्थना बेहेरे..

अहमदनगर दिनांक 8 ऑक्टोबर-
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते ३ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून १२ ऑक्टोबरला नवरात्र उत्साहाची सांगता होणार आहे. या दरम्यान, एकीकडे मनोभावे देवी मातेची पूजा, आराधना आणि साधना करण्यासोबत दुसरीकडे नऊही दिवस रास गरबा आणि दांडिया तितक्याच जल्लोषात खेळताना तरूणाई दिसते. नवरात्रौत्सवात राज्यभरातील अनेक शहरात गरबा नाईट्स कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचप्रमाणे अहमदनगर शहरातील विविध ठिकाणी गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले आहेत.

अहिल्यानगर मधील शिवशंकर सोशल फाउंडेशन आणि शंकरलीली इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली., यांच्यावतीने महिला व मुलींसाठी गरबा नाईटचे आयोजन बंधन लॉन येथे करण्यात आले आहे शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत हा कार्यक्रम होणार असून या गरबा नाईटमध्ये आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.उद्योजक अमित गटणे आणि करण भळगट यांनी माहिती दिली असून यावर्षी गरबा नाईट दांडियाचे हे दुसरे वर्ष आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट अभिनेत्री प्रार्थना बेहेरे असून आलेल्या महिलांना आणि युवतींना प्रार्थना बेहेरे यांच्या बरोबर दांडिया खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर दांडिया मध्ये सहभागी होणाऱ्यांना बेस्ट ड्रेपरी , बेस्ट कपल, बेस्ट ग्रुप आणि बेस्ट सेल्फी यामध्ये विविध बक्षिसांची लयलुट यावेळी होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमावर यावेळी सामाजिक भान लक्षात ठेवून आयोजकांनी या कार्यक्रमात नऊ नवदुर्गांचा सन्मानही ठेवला आहे विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि आपलं नाव लौकिक कमावणाऱ्या महिलांचा यावेळी प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.

प्रसिद्ध निवेदक अमित रेखी यांच्या अँकरिंग सह मौज मस्ती आणि त्याचबरोबर या ठिकाणी खाद्यपदार्थांचेही विविध स्टॉल लावण्यात येणार असून नॉन स्टॉप डीजे फोटोग्राफीची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.

अकरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या गरबा नाईट साठी
सहभागी होणाऱ्यांना पास मिळण्यासाठी गुलमोहर रोड येथील कॅफे सायंतारा, प्रोफेसर कॉलनी चौक येथील राज ऑप्टिकल्स, नवी पेठ येथील डी. एम. मुळे, आणि टिळक रोड येथील शुभम मोबाईल शॉप येथे संपर्क साधू शकता. अथवा 08999085454 या मोबाईल नंबर वर ही संपर्क साधून आपले तिकीट/ पास आजच बुक करू शकता अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version