अहमदनगर दि.१८ जुलै
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर आता पक्षांतर्गत कारवाईला सुरुवात करण्यात आली असून आज महाराष्ट्र मधील अकरा पदाधिकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ करत असल्याचे प्रसिद्धीपत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी काढले आहे.
या प्रसिद्ध पत्रकार तर्फ करण्याचे कारणही देण्यात आले असून महराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून २ जुलै, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये पक्षातील काही आमदारांनी
सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सदर कृत्य पक्षविरोधी असून या आमदारांविरोधात पक्षाने अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे.सुथो या कृत्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खालील काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यास जाहीर पाठिंबा दिला सुथो असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरची कृती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत व पक्षविरोधी असल्याने खालील पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरुन व संघटनेतील पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचं प्रसिद्धी पत्रकात जाहीर करण्यात आले आहे.आहे. तसेच यापुढे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ.सुथो वापर करू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
बडतर्फ केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे
बाबाजी जाधव,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष,राजाराम मुळीक,वसई विरार जिल्हाध्यक्ष,अजित दामोदर गव्हाणे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष,अभिजीत खोसे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष,प्रशांत कृष्णराव शितोळे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष,राहूल हनुमंत भोसले,पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष,जगदीश शंकर शेट्टी,पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्,फजल दस्तगीर शेख, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्, ए. वाय पाटील, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष, रविंद्र पगार, नाशिक (दिंडोरी लोकसभा) ,माणिकराव विधाते अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष