Homeशहरशहर वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर पत्रकार चौकात दोन तासात 32 हजार रुपयांचा...

शहर वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर पत्रकार चौकात दोन तासात 32 हजार रुपयांचा दंड वसूल दुचाकी वर घराबाहेर पडताना सर्व कागदपत्रे घेऊनच बाहेर पडा अन्यथा होऊ शकतो मोठा दंड

advertisement

अहमदनगर दि.१८ जुलै
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरात विविध चौकांमध्ये अचानकपणे नाकाबंदी करण्यात येऊन वाहन धारकांची तपासणी सुरू आहे. शहर वाहतूक शाखा आणि संबंधित पोलीस ठाणे यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी संध्याकाळी पत्रकार चौकात दोन तास राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान सुथो शहर वाहतूक पोलीस आणि तोफखाना पोलिसांनी सत्तर वाहन चालकांवर कारवाई करत एकूण बत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल केला.


शहरातील पत्रकार चौक, एसपी ऑफिस चौक, जीपीओ चौक, मार्केट यार्ड चौक, चांदणी चौक, जुने बसस्थानक, पुणे रोड, यांच्यासह शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक भिस्तबाग चौक एकविरा चौक या ठिकाणीही टप्प्याटप्प्याने सुथो कारवाई करण्यात येत आहे. चेन स्नॅचिंग च्या घटना तसेच चोरीचे प्रकार वाढत असल्यामुळे पोलिसांनी अचानकपणे नाकाबंदी करून दुचाकी वाहनांची तपासणी सुरू केली आहे.शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत. ट्रिपल सीट, लायसन्स नसणे, नंबरप्लेट नसलेल्या तसेच, अल्पवयीन विद्यार्थी अशा ७० दुचाकी वाहनांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत क्यू आर कोड द्वारे ,५४०० आणि रोख २६८०० असा एकूण ३२ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला.

शहर वाहतूक शाखेकडून पोलीस निरीक्षक एम. एल.पेद्राम आणि तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली वाहनावर कारवाईची मोहिम राबविली होती. सुथो यासाठी शहर वाहतूक शाखेचे सात ते आठ कर्मचारी आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे आठ ते दहा कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.

ही कारवाई असेच रोज विविध ठिकाणी सुरू राहणार असून नागरिकांनी दुचाकीवर घराबाहेर पडताना गाडीचे कागदपत्रे,लायसन्स आणि गाडीवर सुस्पष्टपणे दिसणारी नंबर प्लेट लावावी असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पेद्राम यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular