अहमदनगर – दि.१२ डिसेंबर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी अखंडितपणे ६० वर्ष समाजामधील विविध घटकांचे, दिन दुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राच्या यशाच्या योगदानामध्ये शरदचंद्रजी पवार यांचा मोठा वाटा आहे. राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून देशपातळीवर एक आदर्श नेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे. शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. सारसनगर येथील दामोदर विधाते विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येकाने सण,उत्सव, वाढदिवस साजरे करत असताना सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडावे. शरदचंद्रजी पवार यांचे विचार आजच्या युवकांनी आत्मसात करून शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावे राजकारणातील एक आदर्श व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण देश पाहत आहे. असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दामोदर विधाते विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष प्रा.अरविंद शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे, स्थायी समितीचे मा.सभापती अविनाश घुले, प्राध्यापक खासेराव शितोळे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, सुमित कुलकर्णी,युवक अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर,आनंद गारदे,प्रा. भगवान काटे,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे,संतोष ढाकणे, संजय सपकाळ,माऊली जाधव तुषार उर्कीडे, साधना उर्कीडे, गणेश बोरुडे,अमित खामकर, मळू गाडळकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते म्हणाले की, नगर शहरामध्ये आ.संग्राम जगताप यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विकास कामांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. शरदचंद्रजी पवार यांचे विचार व पक्षाचे ध्येय धोरण समाजामध्ये घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज दामोदर विधाते विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे विविध सामाजिक उपक्रमांनी नगर शहरामध्ये मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला आहे असे ते म्हणाले.