Home विशेष निखील बाबासाहेब वारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय सेवा व स्पर्धा परिक्षांची तयारी...

निखील बाबासाहेब वारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय सेवा व स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या प्रबोधनासाठी विशेष कार्यक्रम

अहमदनगर दि.६ ऑक्टोबर

वाढदिवसानिमित्त विविध खर्चांना फाटा देऊन समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने आणि तरुण पिढीला ज्या समस्यांना सध्या तोंड द्यावे लागत आहेत अशा प्रश्नांना हात घालण्यासाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.

माजी नगरसेवक निखील बाबासाहेब वारे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, ८ ऑक्टोबर  रोजी सायंकाळी ४.३० वाजता आनंद लॉन्स् दसरेनगर, वसंत टेकडी या ठिकाणी विविध शासकीय सेवा व स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या प्रबोधनासाठी विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते तसेच  महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे,पोलीस उपअधीक्षक,अण्णासाहेब जाधव,प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,विभागीय, उपनिबंधक दिग्विजय आहेर,पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,सहाय्यक, कामगार आयुक्त नितीन कवले,अधीक्षक, उत्पादन शुल्क गणेश पाटील,महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र अतुल दवांगे,अधीक्षक, उत्पादन शुल्क, गणेश बारगजे,.डॉ. सुरेश सोनवणे, आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

तर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचं व्याख्यान हे असणार आहे सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे आणि या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो मात्र या स्पर्धेमुळे काही वेळा मानसिक खच्चीकरण तसेच आपण कुठेतरी कमी पडतोय का या विचारांनी माणूस खचून जात आहे तसेच पालकांनाही आपला मुलगा पुढे जावे अशी इच्छा असती त्यामुळे काही गोष्टी मुलांवर लादल्या जातात आणि त्याचे दुष्परिणाम काही दिवसानंतर दिसतात यावरच गणेश शिंदे यांचे व्याख्यान असणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केला आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९८५००००८५२ संपर्क करण्याचे आवहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version