मुंबई दि.३० ऑक्टोबर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर तसेच पत्रकारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी जवळील महात्मा फुले विद्यापीठ येथील गणेश नारायण गोटे,( 29 वर्ष, पीएच.डी.चा विद्यार्थी, महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर) यास महाराष्ट्र सायबर सेल ने ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की 14 ऑक्टोबर 2022 रोजी, महाराष्ट्र सायबर शाखेला एक तक्रार प्राप्त झाली होती एक अज्ञात व्यक्ती विशिष्ट ट्विटर हँडलचा वापर करून तो त्या ट्विटर हँडलचा वापर करून महरष्ट्राचे मुख्यमंत्री,यांच्यासह राज्यातील विविध राजकिय पक्षांचे नेते यांच्या बद्दल तसेच ट्विटर हँडलचा वापर करून महिलांशी गैरवर्तन करत होती आणि काही महिला पत्रकारांनाही शिवीगाळ करत असल्याचंही या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं.
आपली ओळख होऊ नये म्हणून हा ट्विटर हँडल वापरकर्ता चांगलीच खबरदारी घेत होता. तो राहुरी विद्यापीठ फिटर हँडल करत असून सुद्धा त्याचा वापर मुंबईतुन होत असल्याचं समोरच्याला समजत असे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र सायबरने तांत्रिक शोध घेतला आणि ती व्यक्ती प्रत्यक्षात अहमदनगरमधील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून काम करत होती आणि ते ट्विट करत असल्याचे आढळून आले.
तांत्रिक पुष्टीकरणानंतर महाराष्ट्र सायबरची टीम २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून निघाली आणि २९ ऑक्टोबर रोजी काही संशयितांवर छापे टाकून 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन महाराष्ट्र सायबर टीमने मुंबईत आणले होते. दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींनी पोस्ट केलेला काही मजकूर या गुन्ह्यात आणखी काही जणांनी तयार केला असावा आणि या तपासासाठी जप्त केलेली गॅजेट्स सायबर फॉरेन्सिककडे पाठवली आहेत,
तपासाअंती गणेश नारायण गोटे, 29 वर्ष, पीएच.डी.चा विद्यार्थी, महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर याला अटक करून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, मुंबई यांच्यासमोर हजर केले असता , दंडाधिकारी यांनी गणेश गोटे यास 2 नोव्हेंबर पर्यंत (4 दिवस) पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास एडीजी ईओडब्ल्यू/सायबर,मधुकर पांडे,एसपीएल आयजी सायबर यशस्वी यादव, आणि एसपी, महाराष्ट्र सायबर संजय शिंत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले तपास करत आहेत.