Homeराजकारणसुजय दादा आता विसरलात तुम्ही...शिवसेना उध्दव ठाकरे गट अधिकृत फेसबुक पेजवरील ती...

सुजय दादा आता विसरलात तुम्ही…शिवसेना उध्दव ठाकरे गट अधिकृत फेसबुक पेजवरील ती पोस्ट होतेय चांगलीच व्हायरल…

advertisement

अहमदनगर दि.१नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सोमवारी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी या उड्डाणपुलाची पाहणी केली तसेच 19 नोव्हेंबर राजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या उड्डाणपलाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती ही खासदार सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांना दिली.

अहमदनगर शहरातील ज्या उड्डाणपुलाला चांगलाच इतिहास आहे उड्डाणपूल होण्याकरिता तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे खासदार दिलीप गांधी यांनी खूप प्रयत्न केले होते. तसेच अहमदनगर शहराचे आमदार अनिल राठोड यांनी सुद्धा या उड्डाणपुलासाठी वेळोवेळी आंदोलन ,उपोषण आणि मुंबईमधील बांधकाम विभागाचे मंत्री यांच्याबरोबर बैठका घेऊन उड्डाणपूलाचे काम मार्गी लागावे म्हणून प्रयत्न केले होते. मात्र उड्डाणपूलाचे काम सुरू होण्यासाठी 2019 साल उजाडले होते. विशेष म्हणजे जेव्हा या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले तेव्हा माजी खासदार दिलीप गांधी आणि माजी आमदार अनिल राठोड या दोघांचेही निधन झाले पुढील काळात खा. सुजय विखे पाटील यांनी उड्डाणपुलासाठी लागणारी लष्कराची जागा मिळण्याबाबत दिल्ली दरबारी पाठपुरावा करून उड्डाणपुलाचे काम मार्गी लावले.

या उड्डाणपुलाच्या प्रश्नावर अनेक निवडणुकांमध्ये चांगलेच राजकारण झाले राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना शिवसेनेने उड्डाणपूल व्हावा याकरिता आंदोलन केली होती तर नंतरच्या काळात शिवसेना भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सुद्धा उड्डाणपूल व्हावा याकरता आंदोलने केली होती.

सोमवारी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपुलाची पाहणी करून 19 नोव्हेंबर रोजी पुलाचा वापरण्यासाठी शुभारंभ होणार असल्याची माहिती दिली. मात्र या सर्व ओघात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती असताना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून सुजय विखे खासदारकी लढवत होते त्यावेळी माजी आमदार अनिल राठोड आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील यांना निवडणुकीच्या काळात चांगलीच मदत केली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर विरोधी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.त्यावेळी या निवडणुकीत चांगलेच आरोप प्रत्यारोप झाले होते मात्र मधल्या काळात पुन्हा एकदा खासदार सुजय विखे आणि आं.संग्राम जगताप यांची समझोता एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे शिवसेनेचा गोटा मध्ये खासदार सुजय विखे यांच्या बद्दल चांगलीच नाराजी पसरली आहे. अनेक वेळा ही नाराजी शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून व्यक्तही करण्यात आली होती. सोमवारी झालेल्या उड्डाणपूलाच्या पहाणी नंतर पुन्हा एकदा ही नाराजी समोर आली असून शिवसेनेच्या अधिकृत पेजवर सुजय दादा आता विसरलात तुम्ही…पण आम्ही विसरणार नाही अशी पोस्ट पुन्हा एकदा करण्यात आल्यामुळे शिवसेना खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर नाराज असल्यास समोर आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular